कराड : येवती ता. कराड येथील श्री भैरवनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात आनंदात पार पडली, या यात्रेसाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली ,यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे अभिषेक , होमहवन व सत्यनारायणाची महापूजा व दुपारी बारा वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते , शुक्रवारी यात्रेच्या मुख्यदिवशी सकाळी 6 वा .देवाचा छबिना सासनकाठ्या सह वाजत गाजत निघाला, सायंकाळी 4 वा. यात्रेच्या निमित्ताने भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते, या कुस्ती मैदानाचे उद्घाटन श्री भैरवनाथ यात्रा कमिटी येवतीच्या सर्व सदस्यांच्या हस्ते करण्यात आले, या कुस्ती मैदानात नामवंत मल्लांच्या कुस्त्या पार पडल्या, यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती स्थानिक मल्ल मुंबई येथील चिंचपोकळी आखाड्यातील रोहित शेवाळे यांनी जिंकून येवती गावचे नाव रोशन केले, या कुस्ती मैदानात 30 एक कुस्त्या चटकदार झाल्या यात्रा काळामध्ये कराड तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, उंडाळे पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
येवतीत श्री भैरवनाथ देवाची यात्रा उत्साहात : भैरवनाथाच्या नावानं चांगभलं : कुस्ती शौकिनांची मैदानात मोठी गर्दी
RELATED ARTICLES
