आष्टा : ईगल फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित गुणगौरव सोहळा डॉ. अण्णासाहेब डांगे शिक्षण संकुल, आष्टा येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला पद्मश्री दादा इदाते, माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे, डॉ. डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त सूर्यकांत तोडकर, ऑल इंडिया धनगर समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, सौ. संगीता शिंदे, दै. रोखठोकचे संपादक सुरेश माडकर, कार्यकारी संपादक सुरेश राठोड, डॉ. शंकर अंदानी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. शंकर अंदानी लिखित “ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी : एक शोध” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सोहळ्यात फाऊंडेशनच्या सकारात्मक व विधायक कार्याची सर्व मान्यवरांनी प्रशंसा केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले, तर प्रा. महेश मोटे यांनी आभार मानले. प्रभावी सूत्रसंचालन पोपट काटकर यांनी केले.
या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मानपत्र, सन्मानचिन्ह व मानाचा फेटा बांधून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बाबासाहेब राशिनकर, अभिजित पाटील, अशोक शिंदे, संजय गायकवाड, दिपक पोतदार, प्रा. दिलीप जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
