Sunday, November 9, 2025
घरआरोग्यविषयकपाण्याशी नाते – विज्ञान, श्रद्धा आणि कृतज्ञता : डॉ. गौरी कैवल्य...

पाण्याशी नाते – विज्ञान, श्रद्धा आणि कृतज्ञता : डॉ. गौरी कैवल्य गायकवाड

पाण्याच्या भांड्याजवळ दिवा लावणे, एक फूल ठेवणे आणि त्याप्रती हात जोडून कृतज्ञता व्यक्त करणे — हे ऐकताना काहींना थोडेसे धार्मिक, तर काहींना भावनिक वाटेल. परंतु या साध्या कृतीत विज्ञान आणि श्रद्धेचा सुंदर संगम दडलेला आहे.

मी स्वतः डॉक्टर आहे. विज्ञानाच्या कसोटीवर परखल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. मात्र सहा महिन्यांपूर्वी “पाणी” या विषयावर डॉ. मासारू इमोटो यांचे संशोधन वाचले आणि माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. त्यांच्या अभ्यासानुसार पाण्याला स्वतःची स्मरणशक्ती असते. आपण पाणी पिताना ज्या मानसिक अवस्थेत असतो — शांत, रागीट, आनंदी किंवा कृतज्ञ — त्या भावनांचे कंपन पाण्यातील अणूंवर परिणाम करतात. हे बदल प्रत्यक्ष मायक्रोस्कोपखालीही पाहता येतात.

म्हणजेच, आपण ज्या पद्धतीने पाणी “ट्रीट” करतो, त्यानुसार ते शरीरावर चांगले किंवा वाईट परिणाम घडवते. त्यामुळे पाणी पिण्याचा क्षणही एक “ऊर्जात्मक अनुभव” ठरतो.

आपले शरीर ७० टक्के पाण्याने बनलेले आहे. त्यामुळे पाण्याच्या शुद्धतेबरोबरच, त्याच्याशी असलेले आपले मानसिक नातेही तितकेच महत्त्वाचे ठरते. गेल्या काही महिन्यांपासून मी घरात एक छोटा प्रयोग करत आहे — तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवते, रोज ते स्वच्छ धुवून त्याजवळ दिवा लावते आणि एक फूल अर्पण करते. त्यानंतर पाण्याप्रती मनोभावे आभार व्यक्त करून तेच पाणी सकाळी ग्रहण करते.

या साध्या कृतीमुळे घरातील वातावरणात सकारात्मकता वाढली, माझे आणि कुटुंबियांचे आरोग्य सुधारले, आणि दिवसाची सुरुवात आनंदाने होते. पाण्याचा हा सन्मान म्हणजे केवळ धार्मिक रीत नाही, तर एक सचेत विज्ञानाधारित जीवनशैली आहे.

शेवटी इतकेच — आपण पाण्याला “जिवंत” म्हणून मान दिला, तर ते आपल्याला जीवन देईल. दिवा आणि फुल हे फक्त प्रतीक आहेत; खरी गोष्ट आहे ती कृतज्ञतेची भावना.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा