Sunday, November 9, 2025
घरमहाराष्ट्रसातारच्या नगराध्यक्षपदासाठी पत्रकार शरद काटकर यांच्या इंट्रीने अनेकांचे धाबे दणाणले....

सातारच्या नगराध्यक्षपदासाठी पत्रकार शरद काटकर यांच्या इंट्रीने अनेकांचे धाबे दणाणले….

सातारा(अजित जगताप) मुदत संपूर्ण ही तीन वर्ष उलटल्यावर सातारा नगर परिषदेची निवडणूक होत आहे. प्रशासकीय कारभार आणि एकहाती राज्यकर्त्यांची मर्जी याला संपूर्ण सातारकर कंटाळले आहेत. त्यामुळे एक महिन्याने होणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. सातारचे सुपुत्र व ज्येष्ठ पत्रकार, प्रचंड जनसंपर्क असलेल्या शरद तात्यासाहेब काटकर यांनी नगराध्यक्ष पदावर दावा सांगितल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत माहिती अशी की, साताऱ्यातील पत्रकारितेबाबत नेहमीच गौरवशाली व परंपरा सांगितली जाते. पत्रकार भूमिका व त्याबाबत विकास कामांवर होणारी स्तुती सुमने व टीका टिपणी सर्वश्रुत आहे. परंतु, पत्रकार निवडणुकीत सक्रिय सहभाग घेत नाही. कारण, राजकीय नेत्यांना आवाज उठवणारे, सार्वजनिक जीवनात नकोसे असते. काही वेळेला पत्रकार राजकीय आखाड्यात उतरवण्याचे धाडस नेते मंडळी करत नाहीत. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. अशा या कालखंडामध्ये सातारा शहर व परिसरातच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात पत्रकारिते व्यतिरिक्त एक सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस, अडीअडचणीला मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांचा नावलौकिक आहे. क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात सर्वसामान्यांसाठी झटणारे, बालसुधारगृहातील बालकांचे गेले दहा बारा वर्षांपासून वाढदिवस, दिपावलीसाठी बालकांना कपडे हा उपक्रम कोणताही गाजावाजा न करता सातत्याने सुरू आहे.
शासकीय कार्यालयात जाणीवपूर्वक अडकून ठेवलेली अनेक कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी ते आपली पत्रकारिता बाजूला ठेवतात. एक वेळ बातमी उशिरा लागली तरी चालेल. आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला न्याय मिळावा. या भूमिकेतून त्यांनी काम केलेले आहे .
जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, शाळा महाविद्यालय प्रवेश व औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरी, लघु उद्योगासाठी मिळणारी चालना,एवढेच नव्हे तर पुनर्वसनाचे दाखले असतील आणि एखाद्याला तातडीने वैद्यकीय प्रमाणपत्र हवे असेल तर अशा वेळेला स्वतः अधिकाऱ्यांकडे बसून सामान्य माणसाची कामे करून दिली जातात. आणि हे काम करत असताना कोणताही मोबदला अथवा चहापाण्याची अपेक्षा ठेवत नाही.
सातारा नगरपालिकेबाबत एका वर्षात नगरसेवक दोन चाकी वरून चार चाकी वर येतो. आणि पुढे तो विविध कॉन्ट्रॅक्ट घेऊन स्वतः ठेकेदार बनतो. हे सर्व कशामुळे झाले? तर आपल्या एका मतामुळे झालेले आहे. आणि हेच मत जर योग्य व्यक्तीला गेले तर आता जे आपण म्हणतो की, महाराष्ट्रात ऐतिहासिक वारसा लाभलेली सातारा ही मोठी ग्रामपंचायत हे जर खोडून काढायचे असेल तर आपल्याला चांगला मतदार बॅलेट पेपर पर्यंत येऊन त्यांना मतदानाचा अधिकार दाखवून द्यावा. हे करत असताना नगराध्यक्ष सुद्धा चांगला आणि निस्वार्थी असावा या अपेक्षेनेच जेष्ठ पत्रकार शरद काटकर यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी आता जनमानसातूनच केली जात आहे. वास्तविक पाहता सार्वत्रिक निवडणूक म्हटलं की, आता दारूचा ढीग आणि पैशाचा महापूर त्याचबरोबर आरोप प्रत्यारोप आणि राजकीय आसरे यांची महायुती व महाविकास आघाडी झालेले आहे. अशा वेळेला सातारा नगराध्यक्षपदी निर्व्यसनी, निस्वार्थी, व्यक्तिमत्व आणि सामान्य माणसांचे तसेच पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून शरद काटकर यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी. यासाठी सर्वच पत्रकार बंधू व भगिनी सक्रिय झालेले आहेत. चांगल्या बातमीचे सातारकरांनी नेहमीच कौतुक केलेले आहे. त्याचबरोबर हेतू परस्पर व व्यक्तीनिष्ठ बातम्या यांची टीकाटिप्पणी करून आपले मत नोंदवले आहे. त्यामुळे जागृतपणाने मतदारांनी आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत. त्या परिपूर्ण करण्यासाठी जेष्ठ पत्रकार शरद काटकर यांना मत द्यावे. हे मत वाया जाणार नाही. किंवा टक्केवारीच्या प्रचलित धोरणांमध्ये अडकून पडणार नाही. याची अनेकांनी खात्री दिलेली आहे. एका दिवसात इतिहास घडत नाही तर इतिहास घडवणाऱ्या माणसांना ठामपणाने पाठिंबा देणे गरजेचे आहे. ही संधी पुन्हा मिळणार नाही. कारण, बलाढ्य हत्ती समोर एक प्रामाणिक प्राणी सुद्धा विजय संपादन करतो. परंतु बलाढ्य हत्ती आपल्या हत्तीच्या बळावर तो पायाखाली चिरडून टाकतो पण जर मुंगी त्याच्या कानात शिरली. तर हत्ती सुद्धा भुई सापट हेच आपल्याला दाखवून द्यायचंय आहे. निवडणुका म्हटलं की मतदारांना दिवसाढवळ्या स्वप्न दाखवली जातात. परंतु ज्यांच्या पाठीशी कोणी नाही. असे अनेक बाल सुधार घरातील बालकांना घडवण्यासाठी गेले अनेक वर्ष प्रामाणिकपणाने सेवा करणारे जेष्ठ पत्रकार शरद काटकर आहेत .कोणत्याही आमिषाला बळी न पडता जे काम केलेले आहे. त्या कामाची उतराई म्हणून नगराध्यक्ष पदासाठी त्यांची अनेकांनी शिफारस केलेली आहे. अनेकांवरील ज्येष्ठ पत्रकार काटकर यांना पाठिंबा देऊ नये म्हणून दबाव येत असेल या दबावाला बळी न पडता आपण लोकशाही व विकास कामासाठी आत्मचिंतन करून मतदान करावे ही विनंती अनेकांनी केली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अमित कुलकर्णी, भाजपाचे युवा नेतृत्व, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत समन्वयाची भुमिका बजावणारे अविनाश कदम, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे निष्ठावंत संग्राम बर्गे, एक कुशल संघटक, राजेंचे निष्ठावान समजले जाणारे सुशील मोझरी अशी अनेक नावे चर्चेत असताना लोकसंपर्क, जनमानसाच्या जोरावर निवडणूक रिंगणात उतरल्याने नेते मंडळीसह इच्छुकांची गोची झाली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा