करहर(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यामध्ये उमेदवारी अर्ज मागण्यासाठी समाज माध्यमावर चळवळ सुरू असतानाच जावळी तालुक्यातील म्हसवे जिल्हा परिषद गटात एकसष्ठी साजरी करणारे तरुण तडफदार नेते व सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती वसंतराव ज्ञानदेव मानकुमरे यांनी म्हसवे जिल्हा परिषद गटात सोमर्डी गावातूनच प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजप स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रभारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वसंतराव मानकुमरे यांनी परिधान केलेल्या जॅकेटच्या संदर्भात निवडणुकीचे संकेत दिले आहेत. सातारा जिल्हा परिषदेमधील पहिली उमेदवारी बहुदा जावळी तालुक्यात जाहीर करण्यात आल्याचे मानण्यात येत आहे.
म्हसवे गटात वसंतराव मानकुमरे हेच उमेदवारी करतील यावर शिक्कामोर्तबच झाला असल्याने त्यांच्या विरोधात अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्याचबरोबर अर्ज माघारी घेणाऱ्यांचेही चांगलेच कोड कौतुक होणार आहे. असं अनुभवातून अनेक जण बोलू लागलेले आहेत. अर्ज दाखल करून माघार घेणाऱ्यांना आता स्थानिकांनी जाब विचारावा .अशी मागणी पुढे आलेली आहे.
राजकीय दृष्ट्या सर्वपक्षीय कार्यकर्ते असलेल्या जावळी तालुक्यातील सोमर्डी येथील सोमर्डी-शेते सोसायटी इमारत उद्घाघा टन,व नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक वाचनालय इमारत भूमिपूजन कार्यक्रम तसेच श्री मानकुमरे यांच्या वाढदिवसाच्या धुमधडाक्यात एकाच मंचकावरून सर्व कार्यक्रम उरकण्यात आले. त्याचीही चांगलीच चर्चा रंगू लागलेली आहे.
यावेळी सातारा जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड सहकारी साखर कारखाना चेअरमन सौरभ शिंदे, उद्योजक दत्ता पवार- भालेघरे, जावळी बँक चेअरमन विक्रम भिलारे,व्हॉईस चेअरमन चंद्रकांत दळवी, माजी उपसभापती दत्ता गावडे, प्रकाश भोसले,मोहन मानकुमरे,चंद्रकांत गावडे,हिंदुराव तरडे, रवींद्र परामणे, सातारा जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, सौ जयश्री मानकुमरे, सौ वनिता गोरे, सौ कविता जगताप, मनोज परामणे, सलीम आत्तार, मुन्ना सुतार, संतोष शेलार, राजू परामणे, एकनाथ रोकडे, बापूसाहेब मानकुमरे , संतोष वारागडे, अनिल भिलारे, शंकर चिकणे, तात्यासो कांबळे, संतोष परामणे यांच्यासह करहर, कुडाळ व मेढा परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या भाजप कमळ चिन्हावर लढवण्याचा निर्णय झालेला आहे. महायुतीच्या माध्यमातून ज्या जागा मिळतील. त्या सर्व जागी यश संपादन करण्यास कोणती अडचण नाही. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघात विकास कामे केल्यामुळे विक्रमी मताने उमेदवार निवडून येणार आहेत. सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे असे नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
यावेळी नेते वसंतराव मानकुमरे यांनी “शेर को डरा सकते है !धमका नही सकता अशी शायरी करून आपण जावळी तालुक्यासाठी खूप संघर्ष केलेला आहे आजी-माजी आमदारांची मोलाची साथ मिळालेली आहे. आजही आमचे चांगले संबंध असल्यामुळे या निवडणुकीत निश्चितच यश मिळणार आहे. एकसष्टी साजरी झाली तरी मी तरुण आहे. आता माझे शिंदे साहेबांच्या डोक्यावरील केस गेले असले तरी डोक्यातील राजकारण अजून सुरू आहे. अशा विनोदी शैलीमध्ये त्यांनी आपली उमेदवारी व कार्यकर्त्यांना कमळ चिन्हाचा प्रचार करण्यास संकेत दिले आहेत.
मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने वसंतगड या ठिकाणी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीतही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कर वाढ बाबत स्थगिती देणे ऐवजी ती रद्द करण्याची मागणी विरोधकांकडे केली. विरोधकांना जर ते जमत नसेल तर त्यांनी नवी मुंबईतच राजकारण करावे असे मोलाचा सल्ला दिला. दरम्यान, नेते श्री मानकुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा जावळी तालुक्यात निवडणुकीचे वातावरण सुरू झाले असून दिवाळीनंतर पुन्हा दिवाळीच्या प्रतीक्षेमध्ये फटाक्याची आतिश बाजी व गुलालाची उधळण होणार असल्याने पुढील पंधरा दिवसांमध्ये महागाई, बेरोजगारी व मूलभूत प्रश्नांकडे कानाडोळा केल्याशिवाय राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना व समर्थकांनाही चैन पडणार नाही. असे दिसून येत आहे.
——— ——— ———- ——- ———- —–
फोटो– वसंतराव मानकुमरे यांचा एकसष्टी निमित्त सत्कार व
चांदीची गदा देताना नामदार श्रीमंत छत्रपती भोसले व दत्ता गावडे, ज्ञानेश्वर रांजणे, संदीप परामणे, सौरभ शिंदे (छाया– अजित जगताप)
