Saturday, November 8, 2025
घरमहाराष्ट्रअलका भुजबळ यांना "रापा" पुरस्कार प्रदान

अलका भुजबळ यांना “रापा” पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी :

न्यूज स्टोरी टुडे पोर्टल च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांना “उत्कृष्ठ पोर्टल निर्मात्या” म्हणुन दूरदर्शन निवेदिका तथा चित्रपट निर्मात्या अमृता राव यांच्याहस्ते ” रापा” पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. यावेळी जेष्ठ चित्रपट निर्माते _ दिग्दर्शक श्री किरण शांताराम , जेष्ठ चित्रपट तंत्र तज्ञ श्री उज्ज्वल निरगुडकर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख होते.

पुरस्कार स्विकारल्यावर बोलताना, अलका भुजबळ यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी कोरोनाच्या भयंकर परिस्थितीत लोकांना घाबरवून न सोडता धीर, दिलासा देण्यासाठी, स्वतः पत्रकार असलेल्या मुलीने; देवश्रीने हे पोर्टल सुरू केले. ज्या उद्देशाने पोर्टल सुरू करण्यात आले, त्या उद्देशांशी पोर्टल आजतागायत प्रामाणिक राहीले आहे. त्यामुळेच कला, साहित्य, संस्कृती, आरोग्य, विद्यान, यश कथा, पर्यटन विश्व बंधुत्व असा जग भरातील लोकांच्या भल्याचा
आशय सचित्र तसेच शक्य असल्यास व्हिडिओ सह प्रसारीत करण्यात येतो.
पुरस्कार स्विकारताना, या पोर्टलचे संपादन करणारे, त्यांचे पती देवेंद्र भुजबळ यांना त्यांनी आवर्जून व्यासपीठावर बोलावून घेऊन, त्यांच्यासह पुरस्कार स्विकारला. यावेळी रेडियो ,टीव्ही ,समाज माध्यमांतील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सरिता सेठी आणि ब्रिज मोहन यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच रेडिओ, टीव्ही, क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी विविध कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रद्य यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

प्रारंभी रापा चे प्रमुख श्री रत्नाकर तारदाळकर यांनी आपल्या प्रास्ताविकात
रापा च्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीचा आढावा सादर केला. पुरस्कार प्रदान करण्याच्या दरम्यान सादर करण्यात आलेल्या विविध मनोरंजन पर कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमास रेडियो, टीव्ही क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ति उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा