मेढा (अजित जगताप) : जावळी तालुक्यातील मुख्यालय असलेल्या मेढा नगरीमध्ये सध्या नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला. त्याचवेळी भ्रम करणारे राजकारण सुद्धा रुळावर येऊ लागलेले आहे. कर वाढी च्या स्थगितीबाबत संपूर्ण महाराष्ट्रात पत्रव्यवहार झाला आहे . असे असताना आम्हीच मेढा नगरीची कर वाढ स्थगिती दिलेली आहे. असा भ्रम करणारे कदम नया है !अशा शेलक्या शब्दात सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजप नेते वसंतराव मानकुमरे यांनी मेढा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
जावळी तालुक्याच्या वतीने मेढा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्याला सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेना नेते शंभूराजे देसाई यांच्यासह एकनाथ ओंबळे, रणजीतसिंह भोसले, संजय सुर्वे, सचिन जवळ, सचिन गोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्यामध्ये भाषण करताना पालकमंत्र्यांकडे मेढा नगरपंचायतीच्या कर वाढीला स्थगिती द्यावी. अशी मागणी करण्यात आली होती. त्याचा सातत्याने भाजपचे नेते पाठपुरावा करत असतानाच सध्या आमच्यामुळेच मेढा नगरपंचायतीची कर वाढ स्थगिती झाल्याचा आयत्या पिठावर रेगोटी ओढण्याचा प्रकार होत आहे. वास्तविक पाहता सर्व महाराष्ट्रातील नगरपंचायतीच्या कर वाढी बाबत सामुदायिक रित्या स्थगिती देण्यात आलेली आहे. तशा प्रकारचा शासनाचा आदेशही निघाला आहे.
त्या आधारे आपणच मेढा येथील कर वाढ स्थगिती दिल्याचे भासवण्यासाठी खोटं बोला पण रिटर्न बोला हा पॅटर्न जावली तालुक्यात रुजवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. त्याला सडेतोड उत्तर मेढा नगरीतील जागरूक नागरिकांनी दिलेले आहे.
याबाबत भाजप नेते वसंतराव मानकुमरे यांनी सौम्य पण शेलक्या शब्दात युवा नेते अंकुश कदम यांचा समाचार घेतला आहे. १९६५ च्या अधिनियमाप्रमाणे नगरपंचायत नगरपालिका कर आकारणी करते. यावेळी स्लॅबचे घर, पत्र्याचे घर व मोकळी जागा अशा संदर्भात नेमका किती कर आकारणी करावी? याची नियमावली ठरवण्यात आलेली आहे. त्या आधारित कर आकारणी होते. मेढा नगरपंचायतीने कर वाढीचा प्रस्ताव सादर केला असला तरी कुणाकडूनही जबरदस्तीने कर गोळा केलेल्या नाही. नागरिकांना कोणताही आर्थिक भुर्दंड झालेला नाही. तरीसुद्धा काही जणांना राजकारण करायचं असल्यामुळे वावड्या उठवल्या जात आहेत. निवडणुकीनंतर हे कोणीही दिसणार नाही. कारण, गेल्या ३० वर्षाचा असे बरेच कदम पाहिलेलेआहेत .हा कदम नया है! असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळेला मेढा नगरीचे जागरूक नागरिक व नेते दत्ता पवार- मेढेकर, कांतीबाई देशमुख, पांडुरंग जवळ, नारायण शिंगटे, दत्ता वारागडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे शासनातील वजनदार मंत्री आहेत. त्यांच्या प्रयत्नाने अनेक विकास कामे होत आहेत. तसेच त्यांनी मेढा नगरीची भरभराटी करण्यासाठी नवीन रुग्णालय, नवीन न्यायालय, नवीन पंचायत समिती व नवीन कार्यकर्ते तयार केलेले आहेत त्यामुळे बॅनरबाजी करून काहींना गर्दी जमवावी लागते. चॅनेलवर चमकण्यासाठी प्रसारमाध्यमावर ही टीका करावी लागते. मेढा नगरीमध्ये बॅनरबाजीतून नगरपंचायतीचा कर न भरणाऱ्यांनी मेढा नगरीची काळजी करू नये. असेही स्पष्ट केले. बेरोजगारी बाबत जावळी तालुक्यात योगदान किती? हे त्यांनी आकडेवारीनुसार सिद्ध करून दाखवावे. महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मेढा नगरीच्या कर वाढी ला स्थगिती देण्याची त्यांची राजकीय उंची नाही. अशी टीका टिपणी करण्यात आलेली आहे. दरम्यान , मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश संपादन करून मेढा नगरीच्या विकासाला अधिक गती देण्याचे काम केले जाईल. तसेच प्रलंबित विकास कामे होत राहतील .असा विश्वासही व्यक्त केला. आपल्या नाकर्तेपणामुळे शिवसेनेच्या मेळाव्याला लोक जमली नाही. हे जरी खरे असले तरी महायुती तील भाजपने लोकांवर दबाव टाकून त्यांना कार्यक्रमाला येऊ नये. असे सांगितले जाते. हे पूर्णपणे खोटे आहे.
जावळी तालुक्यातील लोक स्वाभिमानी असून वाहनाची व्यवस्था केल्यामुळे कुणीही कार्यक्रमाला जात नाही. किंवा भूलथापाला बळी पडत नाही. ज्यांच्या ताब्यात स्वतःच्या गावची ग्रामपंचायत नाही. त्यांनी मेढा नगरपंचायतीच्या सत्तेची स्वप्न पाहू नये. असही मेढा नगरीतील नागरिकांनी माहिती दिली. दरम्यान, याबाबत संबंधितांचे संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
मेढा कर स्थगितीबाबत भ्रम करणारे “” “कदम” “” ” नया है- वसंतराव मानकुमरे
RELATED ARTICLES
