मुंबई : रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय गीत “वंदे मातरम्” चे सामूहिक गायन शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात आयोजित करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार “वंदे मातरम् शतसार्थाब्दी महोत्सवा” अंतर्गत साजरा करण्यात येत असून, आपल्या राष्ट्रीय गीताच्या रचनेच्या १५० व्या वर्षानिमित्ताने विशेष आयोजन करण्यात आले आहे. या सामूहिक गायनात महाविद्यालयातील सर्व शिक्षकवर्ग, सहाय्यक कर्मचारी व विद्यार्थी सहभागी होऊन राष्ट्राभिमान आणि एकात्मतेचा संदेश देणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थ्यांकडून “वंदे मातरम्” या गीताचे संकेत भाषेत सादरीकरण करण्यात येणार आहे, ज्यातून समावेशकता, एकता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे दिला जाईल.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थीवर्ग यांच्यात उत्साहाचे वातावरण असून, रुईया कॉलेज परिसर देशभक्तीच्या सुरांनी दुमदुमणार आहे.
