Thursday, November 6, 2025
घरमहाराष्ट्रश्री निनाईदेवी माता मंदिराचा वर्धापन दिन सोहळा भक्तिभावात संपन्न

श्री निनाईदेवी माता मंदिराचा वर्धापन दिन सोहळा भक्तिभावात संपन्न

शिराळा : श्री गणेश ग्रामविकास मंडळ (चरण), मुंबई यांच्या वतीने चरण गावची ग्रामदैवत श्री निनाईदेवी माता मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. हा सोहळा दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न झाला.

या सोहळ्याचे आयोजन विश्वगौरव पुरस्कृत परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज व श्री श्री १००८ अनंत विभूषित ब्रह्मलिन महामंडलेश्वर परम पूज्य स्वामी आबानंद गिरीजी महाराज (वैराटगड) यांच्या कृपा-आशीर्वादाने करण्यात आले होते. तसेच महंत राजेंद्र गिरी महाराज व महंत आहिल्यागिरी महाराज (श्री पंच दशनाम जुना आखाडा) यांच्या पावन उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

या प्रसंगी विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा, हरिनाम संकीर्तन, प्रवचन व भजनाचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री निनाईदेवी मातांचे दर्शन व आशीर्वाद घेतला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गणेश ग्रामविकास मंडळ (चरण), मुंबई यांचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments