कापसेवाडी : गगनगिरी सेवाभावी संस्था, कापसेवाडी यांच्या सौजन्याने आणि प. पू. महायोगी गगनगिरी महाराजांचे कृपापात्र शिष्य प. पू. ब्रह्मलिन महामंडलेश्वर वैराटवासी स्वामी आबानंदगिरीजी महाराज तसेच वात्सल्यमूर्ती वै. सौ. जयश्री (माई) यांच्या कृपा-आशीर्वादाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा (श्री क्षेत्र आळंदी) निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सोहळा कार्तिक कृष्ण १०, शुक्रवार दि. १४ नोव्हेंबर २०२५ पासून ते सोमवार दि. १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे. या चार दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रम, प्रवचने, कीर्तन, हरिपाठ, जागर भजन, तसेच श्रीगुरु सप्तशती ग्रंथाचे पारायण होईल.
१४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता प्रतिमा पूजन सोहळा होणार असून गगनगिरी महाराज प्रतिमा पूजन: ह.भ.प. देवीदास महाराज मांडवे यांच्या हस्ते, स्वामी आबानंदगिरी महाराज प्रतिमा पूजन: महंत राजेंद्रगिरीजी महाराज यांच्या हस्ते, ज्ञानेश्वर महाराज प्रतिमा पूजन: ह.भ.प. संभाजी पाटील यांच्या हस्ते, कलश पूजन: श्री विजय पोळ (पिंट्या) यांच्या हस्ते, दीप पूजन: श्री बापुराव जाधव, श्री बाळकृष्ण माने, श्री चंद्रकांत पवार यांच्या हस्ते, ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजन: ह.भ.प. कांता भांडवलकर यांच्या हस्ते, विणा व टाळ पूजन: ह.भ.प. बाळू महाराज जाधव (सुरवडीकर) यांच्या हस्ते, मृदुंग पूजन: श्री वाळू बनकर यांच्या हस्ते, श्री गुरु सप्तशती पूजन: ह.भ.प. तानाजी कदम यांच्या हस्ते, दररोज सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत श्रीगुरु सप्तशती ग्रंथ पारायण, तसेच सायं. ६ ते ७ वाजेपर्यंत हरिपाठ व दिंडी समाजाचे हरिनाम होईल.
१४ नोव्हेंबर (शुक्रवार): ह.भ.प. संदीप महाराज भिसे यांचे प्रवचन व कीर्तन, रात्री वैराटवासी स्वामी आबानंदगिरी दिंडी समाज, देवाची आळंदी यांचे भजन-जागर., १५ नोव्हेंबर (शनिवार): ह.भ.प. महादेव महाराज पाटील यांचे कीर्तन, स्व. देसाई महाराज भजन मंडळ मानखुर्द यांचा सहभाग.
१६ नोव्हेंबर (रविवार): ह.भ.प. नंदकुमार महाराज कुमठेकर व ह.भ.प. संतोष महाराज पवार यांचे कीर्तन.
१७ नोव्हेंबर (सोमवार): सकाळी ९ ते ११ — गाथाप्रेमी ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पार्टील (मोसे खोरे-मुळशी) यांचे कात्याचे कीर्तन होणार असून नंतर महाभंडारा होईल.या संधीचा लाभ सर्व भाविकभक्तांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
