प्रतिनिधी : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत हरियाणात एका तरुणीने तब्बल 22 वेळा मतदान केल्याचा धक्कादायक दावा केला. हा मुद्याचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी निवडणुक आयोगावर मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना हल्लाबोल केला.
सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,दिल्लीला जात महाविकास आघाडीसह मनेस पक्षाने निवडणुक आयोगासमोर काही मतचोरीचे पुरावे सादर केले होते. मात्र आमच्या पदरात काहीच पडले नाही. समोरुन काही उत्तर आले नाही. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी हरियाणात एका तरुणीने तब्बल 22 वेळा मतदान केल्याचा खुलासा केला आहे. मात्र, निवडणुक आयोग यावर काहीच बोलायला तयार नाही. निवडणुक आयोगावर दबाव असण्याची शक्यता आहे. दुबार मतदानाचे पुरावे सादर करुनदेखील निवडणुक आयोग कोणतीच कारवाई करत नाही. बिना चौकशीची क्लिनचीट दिली जाते. याचा अर्थ या सर्वाचे निवडणुक आयोग समर्थन करत आहे. असे सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, खरंतर ही निवडणूक घेण्यात काही अर्थ नाहीय. कारण दुर्देव आहे. एका सशक्त लोहशाहीचा ज्याला सार्थ अभिमान आपल्या प्रत्येक भारतीयाला आहे. तिथे मतदार याद्यांमध्ये एवढा घोळ होतोय तो दुरुस्त करा. तंत्रज्ञान एवढं बदललं आहे की, ते आपलं आयुष्य चांगल आणि सोपं करतं. त्यामुळे महिना, पंधरा दिवसात, दोन महिन्यात मतदार याद्यांमधील घोळ नीट करून जानेवारीमध्ये निवडणुका घेता येऊ शकत होते. काहीच घाई नव्हती. एवढी घाई का झाली. या महाराष्ट्र सरकारला 7 वर्षे घाई झाली नाही. एकदम असे काय झाले जितकी आरोपाला धार वाढत गेली तेवढी निवडणुकीची घाई झाली, अशी शंका सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थित केली.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, आमचा पहिला प्रस्ताव आणि आमची इच्छा आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढावं. जिथे जिथे शक्य असेल तिथे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार त्याला आम्ही प्राधान्य देऊ. पुढे स्थानिक नेते त्यांच्या फिडबॅक काय येतो . त्याप्रमाणे नियोजन करुन पुढच्या आठ दिवसात चित्र स्पष्ट होईल. असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रातले महत्त्वाचे प्रश्न आहेत, महाराष्ट्र प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीतून चालला आहे. हा केंद्र सरकारचा डेटा आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. पुण्यासारख्या शहरात भरदिवसा काल क्रूर पद्धतीने हत्या झाली. हे पहिलेच प्रकरण नाही. मग पुण्याच्या कायदे सुव्यवस्थेवर कधी चर्चा होणार? महाराष्ट्रात गुन्हेगारी, गरीबी, बेरोजगारी आणि महागाई वाढलेली आहे. शेतकऱ्यांची दर तीन तासाला एक आत्महत्या होतेय हा मकरंद आबा पाटलांचा डेटा आहे जो त्यांनी विधानसभेत मांडला आहे. मग ही परिस्थिती असेल तर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार का नाही बोलत आहे? असा संतप्त सवालही सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी केला आहे.
पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, आम्ही जरी विरोधक असलो तरी महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीतीसाठी एक विशेष सेशन बोलवा. चर्चा करुया. महाराष्ट्राच्या हितासाठी कधीतरी महाराष्ट्राच्या मुख्यमत्र्यांनी मतभेद सोडून महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र या. जसे ऑपरेशन सिंदूरसाठी आम्ही देशाच्या हितासाठी सगळे एक झालो तशी महाराष्ट्राला आता गरज आहे,असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितले.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, तसेच जिथे तिथे शक्य असेल तिथे आम्ही आघाडी म्हणून लढणार आहे. स्थानिक नेत्यांचे म्हणणे ऐकून स्वबळाचा नारा देण्यात येईल असदेखील सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
