
मुंबई(शांताराम गुडेकर) : महाराष्ट्रात एकूण 288 आमदार कार्यरत आहेत, मात्र त्यापैकी सर्वात उज्वल व परिणामकारक काम चांदवली विधानसभा क्षेत्रात होत असल्याचे गौरवोद्गार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्यात काढले. चांदवली विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात आमदार दिलीप लांडे यांनी विभागात गतवर्षांपासून सातत्याने पूर्ण केलेल्या विकासकामांचा आढावा सादर केला. हा विकासकामांचा विस्तार आणि कामातील बांधिलकी पाहून मंत्री उदय सामंत यांनी आमदार लांडे यांचे विशेष कौतुक केले.
यावेळी मंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटले की, “आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भगवा झेंडा फडकवण्यासाठी सर्वजण तयारीला लागा. युतीचे अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत, जिथे शिवसेना लढेल तिथे शंभर टक्के रिझल्ट असेल असे वातावरण मुंबईत आहे अशी प्रतिक्रिया या वेळी उदय सामंत यांनी दिली.विकासकामे घराघरात पोहोचवा आणि लोकांच्या हृदयात विश्वास निर्माण करा.” कार्यक्रमास उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निवडणूक मोहीमेची तयारी सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. तरसनातन धर्माचा भगवा घेऊन प्रभू श्रीरामाचा धनुष्यबाण घेऊन आता पर्यंत महापौर महायुतीचा बसत होता, यापुढे ही महायुतीचाच महापौर बसेल अशी प्रतिक्रिया या वेळी या मेळाव्याचे आयोजक आमदार दिलीप लांडे यांनी दिली. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासह चांदिवली म. विभाग प्रमुख चंद्रप्रभा मोरे, विधानसभा प्रमुख अशोक माटेकर, माजी नगरसेवक अश्विनी माटेकर, किरण लांडगे, लीना शुक्ला, विजू शिंदे, वाजीद कुरेशी, संजय तुर्डे, युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य प्रयाग दिलीप लांडे यांच्यासह सर्व महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.
