मुंबई(शांताराम गुडेकर) : चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी येथील झोपुयोजनेतील झोपड्या तोडण्याच्या विषयीवर मनपा अधिकाऱ्याच्या वादग्रस्त वक्तव्याचा सिद्धार्थ कॉलनी घर हक्क समितीच्या सदस्यांनी निषेध व्यक्त करत अधिकाऱ्याला जाब विचारला असता या प्रकरणी घनकचरा विभागाचे उमेश पाटील यांनी आपल्या वक्तव्यासाठी झोडीधारकांची माफी मांगितली आहे. चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी मध्ये रूपारेल बिल्डकॉन विकासक मार्फत एसआरए प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पसाठी नुकतेच ५०० हून अधिक झोपडीधारकांनी घरे खाली केली असून ती स्वतःहून घर मालकांनी घर तोडून जागा खाली करून दिली आहेत. मात्र या झोपड्या तोडत असताना मनपा एम पश्चिम घनकचरा विभागाचे सहाय्यक अभियंता उमेश पाटील यांनी येथील लोकांना झोपड्या तोडण्याविषयीं वादग्रस्त विधान करून लोकांचा रोष ओढाऊन घेतला. तुमची घर तोडू नका घर तोडली तर त्यावर दंड आकारण्यात येतील याचं वक्तव्यामुळे झोपडीधारकांमध्ये रोष निर्माण झाला असताना मनपा अधिकारी उमेश पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेदार्थ सिद्धार्थ कॉलनी घर हक्क समितीच्या सदस्यांनी झोपडी धारकांसह मनपा एम पश्चिम कार्यालय गाठले आणि वादग्रस्त अधिकारी उमेश पाटील यांना घेऊन जाब विचारला असता आपल्या वक्तव्याबद्दल उमेश पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत झोपडी धारकांची माफी मांगितली.
मनपा अधिकाऱ्यांच्या वक्तव्याचा सिद्धार्थ कॉलनी घर हक्क समितीने केला निषेध
RELATED ARTICLES
