प्रतिनिधी : धारावीतील संत कक्कया विकास संस्थेचा इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांना जाहीर पाठिंबा असल्याबाबत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. सदर बैठक ही श्री गणेश विद्या मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती ,विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था तसेच सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत,विभागसंघटक विठ्ठल पवार,नगरसेवक वसंत नकाशे,यांच्यासह समाजातील समाजसेवक दिलीप कटके, अध्यक्ष शिवलिंग व्हटकर,माजी शाखाप्रमुख उत्तम शिंदे,दत्ता खंदारे, संदीप कटके,महादेव शिंदे,उनलेश गजाकोश,,महादेव नारायणे,निलेश साळुंके,सतीश कटके, माधुरी गायकवाड, नीता सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
संत कक्कया समाजाचा महाविकास आघाडीच्या अनिल देसाई यांना पाठिंबा
RELATED ARTICLES
एकदम झकास👍👍👍