कराड(विजया माने) : ग्रामीण भागातील मुलींना सक्षम करण्यासाठी मौजे वहागांव येथे वहागांव पंचक्रोशीतील मुलींसाठी सेल्फ डिफेन्स व लाठी काठी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सातारा जिल्ह्यातील सासपडे येथील कु. आर्या चव्हाण हिच्यावर एका नराधमाने अत्याच्यार करून खून केला. या घटनेचा सर्वांनी निषेध व्यक्त केला तसेच काही ठिकाणी कॅण्डल मार्च सुद्धा काढले. परंतु या घटना समाजात वाढत चालल्या आहेत
खरंच आपल्या मुली सुरक्षित आहेत का?एखादा नराधम आपल्या मुलींकडे वाकड्या नजरेने लक्ष ठेऊन आहे का? हा सवाल प्रत्येक पालकांच्या मनात निर्माण झालेला आहे यासाठी आपल्या मुलींना सक्षम करावे लागणार आहे यासाठी पहिले पाऊल म्हणून वहागांव येथे ग्रामीण भागातील मुलींच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते
यामध्ये लाठी काठी व सेल्फ डिफेन्स याविषयी मुलींना प्रशिक्षण देण्यात आले तसेच पोलीस स्टेशन च्या निर्भया पथकातील अधिकारी यांनी सुद्धा मुलींना संरक्षण विषयी मार्गदर्शन केले
सेल्फ डिफेन्स साठी कराटे प्रशिक्षक श्री अंकुश माने सर यांनी मुलींना प्रशिक्षण दिले यामध्ये अडचणीच्या प्रसंगात स्वतःचा बचाव कसा करायचा व पुढच्याला प्रतिकार करून कशी मात द्यायची याविषयी प्रशिक्षण देण्यात आले
लाठी काठी साठी जखिणवाडी गावचे श्री शिवछावा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मुलींना मार्गदर्शन केले. काठी कशी पकडायची इथपासून प्रहार कसा करायचा याची इत्यंभूत माहिती देण्यात आली
कराड तालुका निर्भया पथकाच्या पुष्पा चव्हाण मॅडम, फल्ले साहेब, साळुंखे साहेब , तळबीड पोलीस स्टेशनचे खराडे साहेब,दीक्षित साहेब , मोरे साहेब ,वेल्हाळ मॅडम, करपे मॅडम यांनी मुलींना सक्षम बनविण्यासाठी कायदेशीर मार्गदर्शन केले तसेच कठीण प्रसंगात काय काय करायचे याविषयी मार्गदर्शन केले
वहागांव गावचे आदर्श सरपंच संग्रामबाबा पवार मित्रपरिवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमास गावातील माजी उपसरपंच आनंदी पवार, कृष्णत पवार, बापूराव पवार ,विवेक चव्हाण, संतोष जामदार ,लक्ष्मी पवार ,संतोष जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते
वहागांवमध्ये मुलींसाठी लाठीकाठी व सेल्फ डिफेन्स शिबीराची सुरुवात
RELATED ARTICLES
