Tuesday, November 4, 2025
घरमहाराष्ट्रराज्यात नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल! 2 डिसेंबरला मतदान; 3 डिसेंबरला...

राज्यात नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल! 2 डिसेंबरला मतदान; 3 डिसेंबरला निकाल जाहीर – आजपासून आचारसंहिता लागू

मुंबई : राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुका जाहीर होताच आजपासून म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

निवडणुकीचे वेळापत्रक:

नामनिर्देशन पत्र दाखल : 10 नोव्हेंबर

अंतिम मुदत : 17 नोव्हेंबर

छाननी : 18 नोव्हेंबर

अर्ज माघारी घेण्याची तारीख : 21 नोव्हेंबर

निवडणूक चिन्ह वाटप : 26 नोव्हेंबर

मतदान : 2 डिसेंबर

निकाल : 3 डिसेंबर

मतदारांची संख्या: राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आली.

एकूण मतदार : 1 कोटी 7 लाख 3 हजार 576

महिला मतदार : 53 लाख 22 हजार 870
या निवडणुकांसाठी राज्यभरात 13 हजार कंट्रोल युनिट्स उभारण्यात येणार आहेत.

गुलाबी मतदान केंद्रांची नवी संकल्पना

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने 32 विशेष जनजागृती कॅम्पेन सुरू केले आहेत. काही केंद्रे ‘गुलाबी मतदान केंद्र’ म्हणून सजवली जाणार असून, तेथील सर्व अधिकारी महिला असतील. तसेच दिव्यांग मतदार, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने मतदानाची संधी दिली जाणार आहे.

विभागनिहाय निवडणुकीचा आकडा:

कोकण विभाग : 17

नाशिक विभाग : 49

पुणे विभाग : 60

संभाजीनगर विभाग : 52

अमरावती विभाग : 45

नागपूर विभाग : 55

उमेदवारांच्या खर्चमर्यादेत वाढ

यंदाच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.

‘अ’ वर्ग नगरपालिकांसाठी अध्यक्षपदाच्या उमेदवारांना ₹15 लाखांची मर्यादा

क’ वर्ग नगरपालिकांसाठी ₹7 लाखांची मर्यादा

मतदारांसाठी नवीन अॅप आणि सुरक्षा उपाय

मतदारांच्या सोयीसाठी आयोगाने नवीन मोबाईल अॅप विकसित केले आहे. तसेच दुबार मतदान टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे. डबल स्टार चिन्ह असलेल्या मतदारांना दुसरीकडे मतदान करणार नाही, असे घोषणापत्र (Declaration) भरावे लागेल.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments