Monday, November 3, 2025
घरमहाराष्ट्र१५ दिवसांच्या आश्वासनानंतर जैन समाजाचे आंदोलन स्थगित

१५ दिवसांच्या आश्वासनानंतर जैन समाजाचे आंदोलन स्थगित

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कबूतरखाने बंद केल्याच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत जैन समाजाने आता आक्रमक भूमिका घेत सोमवारी आझाद मैदानात आंदोलन केले. सरकारने १५ दिवसांचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी मुनी निलेशचंद्र महाराज यांच्या सोबत जैन समाजाचे मुनी व समाज सहभागी झाला होता.

सरकारच्या वतीने मंत्री मंगलप्रभात लोढा व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आझाद मैदानात येत सरकारच्या वतीने आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित केले. कबुतरांच्या संरक्षणाचा मुद्दा अग्रस्थानी असून कबुतरांना दाणा टाकणे ही जैन धर्माच्या अहिंसा सिद्धांताशी जोडलेली एक अत्यंत महत्त्वाची परंपरा आणि धार्मिक आस्थेचा भाग आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबूतरखाने बंद झाल्यामुळे अनेक कबूतर मृत्यूमुखी पडल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे कबुतरांचे संरक्षण तातडीने केले जावे अशी त्यांची मुख्य मागणी आहे.

याशिवाय, मुंबईतील जैन मंदिरांची सुरक्षा सुनिश्चित केली जावी आणि राज्यात गोरक्षेची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी, या मागण्याही त्यांनी केल्या आहेत. त्यांची सर्वात महत्त्वाची मागणी अशी आहे की, राज्य सरकारने जैन पूजा स्थळे, कबूतरखाने आणि गोवंशाच्या सुरक्षेसाठी एक स्वतंत्र मंडळ (बोर्ड) स्थापन करावे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments