कराड: कराड नगरपालिकेची निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते. शहरात “काँग्रेसचे अस्तित्व आहे का?” अशी चर्चा सध्या सुरू असली तरी, गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला निर्णायक मते मिळाल्याचे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सक्रियपणे उमेदवार उभे करून पक्षाची ताकद दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कराड शहर काँग्रेसकडून या निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय इच्छुकांची चाचपणी सुरू करण्यात आली असून, स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटनात्मक तयारी केली जात आहे.
“जरी काँग्रेससाठी सध्या संघर्षाचा काळ असला, तरी पक्षाची वैचारिक परंपरा आणि जनतेशी असलेले नाते या संघर्षातून निश्चितच नवा मार्ग काढेल,” असा विश्वास काँग्रेसचे कराड शहर अध्यक्ष ऍड. अमित जाधव यांनी व्यक्त केला.
त्यांनी पुढे सांगितले की, कराड शहरात काँग्रेसचा भक्कम कार्यकर्ता वर्ग आहे. विकास आणि पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून काँग्रेस पुन्हा एकदा नागरिकांचा विश्वास संपादन करेल.
