तळमावले/वार्ताहर : संत तुकाराम यांचा “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी” हा अभंग प्रचलित आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त विटेवर उभे असलेल्या विठूरायाची कलाकृती डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटत सर्वांना कार्तिकी एकादशीच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
डाकेवाडीच्या डाॅ.डाकवे यांना एक बांधकाम चालू असून तिथे काही विटा पडलेल्या होत्या. त्यांनी विटाकडे पाहिलं व त्यांना कल्पना सुचली की आपण या विटेवर जो विठुराया विटेवरी उभा आहे त्याची आपण प्रतिमा साकरावी. ती संकल्पना प्रत्यक्षात आणत त्यांनी अक्रलिक रंगांचा उपयोग करत विटेवर अप्रतिम अशी विठुरायाची प्रतिमा साकारली.
आषाढी वारीच्या निमित्ताने सन 2015 पासून डाॅ. संदीप डाकवे कलात्मक उपक्रम राबवत आहेत. यापूर्वी मोरपीसावर संत तुकाराम, टी शर्ट वर विठूरायाचे चित्र, शब्दातून विठ्ठलाचे चित्र, पोस्टरमधून शुभेच्छा, भिंतीवर वारीचे चित्र, अक्षर अभंग वारी उपक्रम, न अनुभवलेली वारी हस्तलिखित, एका पानावर हरिपाठ, अभंग चित्र वारी उपक्रम, तुळशीपानावर विठ्ठल, वारकरी पंचावर संत तुकाराम, अक्षर चित्र वारी उपक्रम, तुळस पानावर संत तुकाराम, कॅलिग्राफीतून अक्षर वारी असे विविध कलात्मक उपक्रम राबवले आहेत.
डॉ.संदीप डाकवे यांनी वीटेवर साकारली विठूरायाची कलाकृती
RELATED ARTICLES
