प्रतिनिधी(भीमराव धुळप) :


शाहूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रहिमतुल्ला सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली 31 ऑक्टोबर 2025 रोजी “रन फॉर युनिटी – राष्ट्रीय एकता दिन” मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. ही मॅरेथॉन टाटा पॉवर शालिमार इंडस्ट्रियल येथून सुरू होऊन शाहूनगर पोलीस ठाणे येथे संपन्न झाली.
या उपक्रमाचा प्रमुख उद्देश देशातील ऐक्य, एकजूट आणि राष्ट्रीय एकता बळकट करणे तसेच नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना व आरोग्यदायी जीवनशैली निर्माण करणे हा होता.
स्पर्धेत महिलांमध्ये जिज्ञासा सचिन गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर पुरुष गटात अनिकेत संजय सोनार प्रथम, आदित्य संजय सोनार द्वितीय आणि स्पंदन सचिन गायकवाड तृतीय क्रमांकावर राहिले.
या मॅरेथॉनद्वारे समाजात राष्ट्रीय एकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

