प्रतिनिधी – संत कृष्णदास महाराज सत्संग,मुंबई आयोजित वर्ष १२ वे सर्व भाविकांचे आराध्य दैवत श्री विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तगण हातात टाळ, मृदुंग, खांद्यावर विना आणि हाती पताका घेऊन पंढरपूर ला पायी जातात.परंतु ज्या भक्तांना पंढरपूरची पायी वारी करता येत नाही म्हणून गेली १२ वर्षे संत कृष्णदास महाराज सत्संग,मुंबई यांच्या वतीने दादरमध्ये दिंडीचे आयोजन केले जाते. यावर्षी सुद्धा रविवार दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी दादरच्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे फुल मार्केट पासून सकाळी ८.३० ला पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान होईल त्याची सांगता श्री विठ्ठल मंदिर,रानडे रोड येथे होईल.
आषाढी कार्तिकीला भाविक गण अर्थात वारकरी श्रद्धापूर्वक प्रेमाने पंढरपूरला जाऊन श्री विठू रायचे भक्तिभावाने दर्शन घेऊन आनंद लुटत असतात.तोच आनंद तोच उत्साह, फुलांची,रांगोळीची सजावट, भक्तासाठी जागोजागी अल्पोहार ठेवला जात असतो. यावेळो मोठ्या उत्साहाने हा सोहळा याची देही,याची डोळा भक्तांना बघायला मिळणार आहे.त्यामुळे या संधीचा लाभ मुंबईतील सर्व वारकरी बंधू तसेच भक्तांनी घ्यावा असे आवाहन संत कृष्णदास महाराज सत्संग,मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्तिकी एकादशीनिमित्त दादरमध्ये २ नोव्हेंबरला पायी दिंडी सोहळा
RELATED ARTICLES
