मुंबई (मोहन कदम/शांताराम गुडेकर) : ज्येष्ठ संशोधक, शिक्षाविद, विद्यावाचस्पती गणपती दादासाहेब यादव यांची व्हिजन इंडिया डॉक्युमेंटरी अध्यक्ष स्वप्निल राणी नंदकुमार यांनी एसपीएसटी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश रासम यांच्या समवेत दिवाळीच्या शुभकामना व्यक्त करण्यासाठी भेट घेतली.या भेट प्रसंगी विजन इंडिया डॉक्युमेंटरी उपसंपादक राहुल गायकवाड यांचीही विशेष उपस्थिती लाभली.प्रोफेसर जी.डी.यादव भारतातील शिखर प्राप्त शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक तथा संशोधन कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या संस्थांचे संस्थापक तथा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.कोल्हापूर राधानगरीमध्ये जन्मगाव असलेल्या यादव सरांचे अतुलनीय कार्य लक्षात घेऊन त्यांना भारत गणराज्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारा मंत्रिमंडळ शिफारस पश्चात तत्कालीन महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या शुभ हस्ते सर्वोच्च नागरी सन्मान,पद्म सन्मानाने अलंकृत करण्यात आले आहे. पद्मश्री अलंकृत व्यक्तींचा जीवनपट लोकांसमोर यावा या उद्देशाने निर्मित विजन इंडिया डॉक्युमेंटरीमध्ये त्यांची मुलाखत प्रसारित करण्यासाठी सदर भेट होती. सदर मुलाखती दरम्यान श्री.मंगेश रासम यांनी यादव सरांचा विशेष सत्कार केला.
पद्मश्री जी.डी.यादव यांची व्हिजन इंडिया डॉक्युमेंटरीसाठी स्वप्निल राणी नंदकुमार यांनी घेतली सदिच्छा भेट
RELATED ARTICLES
