
म

ुंबई : धगधगती मुंबई वृत्तपत्र आणि महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी छोटीशी मदत म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मदतनिधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रमेश संकपाळ सर आणि महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे उपाध्याक्ष राजू मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी कर्करोगग्रस्त रुग्णाच्या हस्ते धगधगती मुंबई दिवाळी अंकाचे प्रकाशन झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच समाजोपयोगी कार्यात सहभाग घेऊन मदत केल्याबद्दल धगधगती मुंबई आणि महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानच्या परिवाराचे मनःपूर्वक कौतुक केले.
यावेळी धगधगती मुंबई दिवाळी अंक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेट स्वरूपात प्रदान करण्यात आला.
