Tuesday, October 28, 2025
घरमहाराष्ट्रसाताऱ्यातील रुग्णालयाला डायलिसिस यंत्रणा भेट देऊन दिवाळी साजरी..

साताऱ्यातील रुग्णालयाला डायलिसिस यंत्रणा भेट देऊन दिवाळी साजरी..

सातारा(अजित जगताप) : येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयांमध्ये डायलिसिस विभागातील यंत्रणा कार्यान्वित झाले आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आय.डी.बी.आय. बँकेच्या वतीने दिवाळी भेट म्हणून रुग्णालयात एक डायलिसिस यंत्रणा आज देण्यात आली. याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी बँकेचे आभार मानले.
सध्या मोठ्या प्रमाणात मधुमेह व रक्तदाब वाढीस लागला आहे. आरोग्याची चांगली काळजी घेतली व नियमित व्यायाम केल्यामुळे तसेच योग्य वेळी उपचार केल्यानंतर आरोग्य निरोगी राहते. परंतु, काही वेळेला अनुवंशिकता व राहणीमान आणि सवयी यामुळे आजार बळावतो. याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे . त्यावरील पुढील उपाय म्हणून किडनी निकामी झालेल्या रुग्णांना डायलिसिस करणे अपरिहार्य होते. याची जाणीव ठेवून सध्या क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात सहा डायलिसिस यंत्रणा द्वारे कामकाज होत आहे. यामध्ये आणखीन एक यंत्रणेची भर पडली आहे.
आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष कदम व आय.डी.बी.आय. बँकेचे अधिकारी निलेश जाधव, वरिष्ठ महिला अधिकारी रोहिणी ढवळे, डॉ. गौरा, संदीप कासुर्डे, पत्रकार अजित जगताप, संदीप माने, रवींद्र काळे, प्रणव सावले ,जयश्री शेलार, यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डायलिसिस यंत्रणा प्रदान करण्यात आली.
सदर डायलिसिस विभागांमध्ये प्रसिद्ध किडनी विकार तज्ञ डॉ. सचिन निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती बेसके, सुरेखा नवले, अजित थोरात, संग्राम जाधव, उषा शिंदे, कीर्ती बंडगर ,
नवराज परियार , युवराज फडतरे या डायलिसिस विभागाचे कामकाज पाहत आहे. आयडीबीआय बँकेने दिलेल्या नवीन डायलिसिस यंत्रणेमध्ये ४० मिनिटं बॅटरी बॅकअप आहे. किडनी निकामी झालेल्या गरजू रुग्णांना डायलिसिसला मदत व्हावी. या भावनेतन बँकेने मानवता जपली आहे. सध्या सातारा जिल्ह्यातील डायलिसिसची सोय करण्यात आली असल्यामुळे त्वरित उपचार मिळत आहेत. अशी माहिती देण्यात आली.
——- ——- ——- —— —— —- —

फोटो– सातारा क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात डायलिसिस यंत्रणा भेट देताना मान्यवर (छाया– निनाद जगताप, सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments