मुंबई | भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात कराड नगरपालिकेतील अनेक मान्यवर नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवत भाजप परिवारात जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमास भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण साहेब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील,कराड दक्षिणेचे आमदार,जिल्हाध्यक्ष डॉ अतुल भोसले यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या वेळी कराड पालिकेतील माजी नगरसेवक व जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष मा. अरुण जाधव, माजी नगराध्यक्षा श्रीमती शारदाताई जाधव, माजी नगराध्यक्ष श्री. अशोक भोसले, माजी नगरसेवक श्री. आनंदराव पालकर, नगरसेवक श्री. शिवाजीराव पवार, माजी नगरसेविका सौ. चंदाराणी लुणीया, जनशक्ती आघाडीचे उपाध्यक्ष श्री. अतुल शिंदे, माजी नगरसेवक श्री. विनायक विभुते, युवानेते श्री. आशुतोष जाधव, माजी नगरसेविका श्रीमती अरुणा शिंदे, तसेच कापड असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रमेश लुणिया यांनी भाजपा प्रवेश केला. या सर्व मान्यवरांचे भाजपा परिवारात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.



