मुंबई(अमोल पाटील) : मुंबई को-ऑपरेटिव्ह बँक युनियनच्या संयुक्त सरचिटणीसपदी श्री. नितीन गवादे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे संघटनेत आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.गवादे हे सदैव कार्यतत्पर, संघटनप्रिय आणि समाजकारणाची जाण असलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. सामान्य लोकांच्या अडीअडचणी दूर करण्यातील त्यांचे नेतृत्वगुण, उत्कृष्ट संवादकौशल्य आणि सर्वांना आत्मीयतेने जोडून ठेवण्याची त्यांची हातोटी यामुळे त्यांची संघटनेत वेगळी ओळख निर्माण झाली आहे. संघटनेतील कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवून संघटन बळकट करण्याची ताकद, सामाजिक बांधिलकी आणि सर्वांना समान वागणूक देण्याचा त्यांचा दृष्टिकोन यामुळे संघटनेला एक अनुभवी, कर्तृत्ववान आणि दूरदर्शी नेतृत्व लाभले आहे.
मुंबई को-ऑपरेटिव्ह बँक युनियनच्या संयुक्त सरचिटणीसपदी श्री. नितीन गवादे यांची निवड
RELATED ARTICLES
