Sunday, October 26, 2025
घरमहाराष्ट्रमोहन नायकवडी मामांच्या कार्यामुळे राष्ट्रवादीला नवे बळ” मिळेल – राज्यसभा खासदार नितीन...

मोहन नायकवडी मामांच्या कार्यामुळे राष्ट्रवादीला नवे बळ” मिळेल – राज्यसभा खासदार नितीन पाटील

कराड (भीमराव धुळप): कराड ग्रामीण भागातील लोकप्रिय समाजसेवक आणि कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक श्री. मोहनराव (मामा) नायकवडी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. मामांच्या सोबत अनेक कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश करून राष्ट्रवादीला नवे बळ दिले.

हा ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळा शनिवार, २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी मौजे घोगाव (ता. कराड) येथे भव्यदिव्य वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मा. खा. नितीन पाटील (काका), खासदार राज्यसभा व अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते.
“तळागाळातील तरुणांना एकत्र आणण्याचे काम वाखाण्याजोगे” – नितीन काका पाटील
या प्रसंगी खा. नितीन पाटील (काका) म्हणाले –“तरुणांचे आधारस्तंभ असलेले मोहन नायकवडी मामा यांनी ग्रामीण भागातील तरुणांना संघटित करण्याचे काम वाखाण्याजोगे आहे. भविष्यात त्यांच्या या कार्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा फायदा होईल. मामांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत आणि लवकरच त्यांना पक्षातील योग्य जबाबदारी देण्यात येईल. ते पुढे म्हणाले , “नुसती संपत्ती असून चालत नाही, ती तळागाळातील लोकांच्या कामी आली पाहिजे. आम्ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारसरणीवर चालतो. अजित दादा पवार जे सांगतात तेच करतात. मामांच्या नेतृत्वाखाली कराड ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक सक्षमपणे उभी राहील.
“संघर्ष करण्याची मानसिकता असली पाहिजे” – अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर

आपल्या थोडक्यात भाषणात अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (दादा) म्हणाले –

“माणसांना सक्षम बनवणे आणि त्यांच्या वाढीसाठी संधी निर्माण करणे हेच खरे समाजकारण आहे. संपत्तीच्या मागे लागणारे अनेक आहेत, पण समाजासाठी संघर्ष करणारी मानसिकता निर्माण झाली पाहिजे. अजितदादांच्या पुरोगामी विचारसरणीला बळ देणे ही काळाची गरज आहे.
या कार्यक्रमास बाळासाहेब सोळस्कर (अध्यक्ष, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),संजय देसाई (कार्याध्यक्ष, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), सौ. सीमा जाधव (अध्यक्षा, सातारा जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), पृथ्वीराज गोडसे (अध्यक्ष, सातारा जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), प्रदीप विधाते (अध्यक्ष, ओ.वी.सी. सेल व संचालक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), डॉ. अरुण माने, सौ. विद्या अरुण माने,तसेच घोगाव गावचे प्रतिष्ठित शंकर पाटील आबा, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन श्री. अमितराज चव्हाण व श्री. विशाल चव्हाण (अध्यक्ष व मार्गदर्शक, कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन) यांनी केले.
कराड दक्षिणमध्ये नवचैतन्याची लाट
कराड ग्रामीण भागातील क्रिकेटच्या माध्यमातून तरुणांशी घट्ट नातं जोडलेले श्रेयस आणि यश नायकवडी यांच्या पक्षप्रवेशामुळे कराड दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवचैतन्य आणि नवे बळ निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ा भव्य सोहळ्याने कराड ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उपस्थिती अधिक भक्कम झाली असून कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments