कराड : महाराष्ट्रीचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कराड शहरात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट गौरव करत आहे. प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार सर्वांसाठी ऊर्जा देणारा आहे असे गौरवोद्गार साम टीव्ही न्यूज चे संपादक निलेश खरे यांनी काढले. ते कराड येथील वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात महाराष्ट्र शासन, मान्यताप्राप्त सहाय्य धर्मादाय आयुक्त संलग्न व आयएसओ मानांकनप्राप्त स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पंदन पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महंत आहिल्यागिरीजी महाराज, प्रेरणादायी वक्ते डाॅ.विनोद बाबर, सुप्रसिध्द गायक विजय सरतापे, दिग्दर्शक अरुण कचरे, उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, टीव्ही 9 मराठीच्या वृत्तनिवेदिका/पत्रकार सेजल पुरवार, सिनेअभिनेत्री प्राजक्ता नवनाळे, सिनेअभिनेते योगेश पोवार, रयत विद्यार्थी विचार मंच (पुणे) संस्थापक/अध्यक्ष ॲड.धम्मराज साळवे, सावली फाउंडेशनच्या संस्थापिका सायली धनाबाई, केतकी प्रकाशनचे चंद्रकांत जाधव, ट्रस्टचे संस्थापक डाॅ.संदीप डाकवे आदी यांची प्रमुख उपस्थिती होती.
संदीप डाकवे यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्रातील माणिकमोती’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि स्व.राजाराम डाकवे (तात्या) वाचनालय व ग्रंथालयाच्या बोधचिन्हाचे लोकार्पण व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर बोधचिन्हाचे रचना सुप्रसिध्द कॅलिग्राफर बाळासाहेब कचरे यांनी केली आहे.
निलेश खरेे पुढे बोलताना म्हणाले की, संदीप डाकवे हे सुंदर चित्रे रेखाटतात. मला कलेची आवड आहे. त्या कलेवरील प्रेमापोटी मी या कार्यक्रमाला आलो आहे. या कार्यक्रमात उद्योजकांचा सन्मान केला जाणार आहे. उद्योजक हे समाजाला दिशा देणारे आणि घडवणारे आहेत.
प्रा.विनोद बाबर यांच्या छोटेखानी भाशणाने सभागृहातील वातावरणात चैतन्य निर्माण झाले तर सुप्रसिध्द गायक विजय सरतापे यांनी पहाडी आवाजात गायलेल्या ‘जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर’ या गीताच्या छोटयाशा झलकेने कार्यक्रमाला ‘चार चाॅंद’ लावले.
आहिल्यागिरीजी महाराज, तंत्र अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, प्राजक्ता नवनाळे, योगेश पोवार, सेजल पुरवार, ॲड. धम्मराज साळवे, लेखिका विजया पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त करत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात डाॅ.डाकवे यांनी स्पंदन ट्रस्टच्या कार्याची माहिती आणि प्रमुख पाहुण्यांची ओळख करुन दिली. स्पंदन जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम पाच हजार रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आहे. यंदाच्या पुराच्या पार्श्वभूमीवर तो पुरस्कार जाहीर न करता त्याची रक्कम पुरग्रस्तांना देण्याचे जाहीर केले. त्यामुळे ‘स्पंदन’चा संवेदनशीलपणा या ठिकाणी दिसून आला.
दरम्यान, विविध क्षेत्रांतील मान्यवरांना प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड पुरस्काराने गोैरविण्यात आले. तसेच स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार, दिवाळी अंक स्पर्धा, सेल्फी विथ गुढी, निबंध स्पर्धेमधील विजेत्यांना सन्मानपत्र आणि तात्या हे पुस्तक देवून गौरवण्यात आले.
याशिवाय सीए परीक्षेत उज्जवल यश मिळवल्याबद्दल अधिक तानाजी डाकवे यांचा विशेष मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. सांची रेश्मा संदीप डाकवे हिच्या नावे ठेवलेल्या ठेवपावतीच्या व्याजातून न्यू इंग्लिश स्कूल काळगांव येथे इ.10 वीत मुलींमध्ये प्रथम आलेल्या कु.वैष्णवी नितीन पाटील हिचा स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोशिक, रोख रक्क्म रु.1,000/-, सन्मानपत्र आणि ‘तात्या’ हे पुस्तक देवून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप डाकवे, सुत्रसंचालन सौ.अंजली गोडसे तर आभारप्रदर्शन चंद्रकांत चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि कु.माधुरी करपे हिच्या भरतनाटयमच्या नृत्यातील गणेशवंदनाने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल डाकवे, सुरेश मस्कर, सत्यवान मंडलिक, समाधान पाटील, जालिंदर येळवे (फौजी), चंद्रकांत चव्हाण, यशराज चव्हाण, शिवम असोसिएट्सचे गुलाब जाधव (फौजी), भिमराव धुळप, ओमकार धुळप, रेश्मा डाकवे, पुनम जाधव, शीतल दवणे, गौरी डाकवे, पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
उत्कृष्ट वार्तांकन ओमकार धुळप पुरस्काराने सन्मानित
यावेळी गणेशोस्तव विशेष वार्तांकन केल्याबद्दल ओमकार भीमराव धुळप यांना प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२५ ने साम टी व्हि चे संपादक निलेश खरे, टी व्हि 9 च्या निवेदिका सेजल पूरवार महंत महायोगी अहिल्यादेवी महाराज यांच्या हस्ते देण्यात आला.




