मुंबई : धारावी विभागातील युवा सेना विभाग अधिकारी सनी शिंदे यांच्या पुढाकारातून या वर्षी दिवाळी सण आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. सनी शिंदे यांच्या वतीने धारावीतील सर्व युवा पदाधिकाऱ्यांना संपूर्ण पोशाख संच, तर महिला पदाधिकाऱ्यांना आकर्षक साडी संच वाटप करून सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
धारावी विभागात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबविला गेल्यामुळे परिसरातील युवा पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमामुळे धारावीतील युवांमध्ये संघटनात्मक एकजूट, सणासुदीचा आनंद आणि समाजकार्याची प्रेरणा निर्माण झाली.
या सोहळ्यास धारावी विभाग संघटक विठ्ठल पवार, विधानसभा प्रमुख वसंत नकाशे, तसेच युवा सेना उपविभागाध्यक्ष सतीश सोनवणे हे मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी सनी शिंदे यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत, धारावी विभागातील युवा सेनेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
यावेळी सनी शिंदे यांनी सांगितले की, दिवाळी म्हणजे एकतेचा आणि आनंदाचा सण. आपल्या पदाधिकाऱ्यांमधील आत्मीयतेचे बंध अधिक दृढ करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. पुढेही असेच सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्याचा संकल्प आहे.
