
म

ुंबई : प्रतीक्षा नगर प्रभाग क्र. 173 मध्ये दक्ष नागरिक आणि पर्यावरण मित्र तानाजी घाग यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या “आठवड्यातील एक दिवस – दोन तास परिसर स्वच्छता अभियानाला” उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून दर शनिवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत ही स्वच्छता मोहीम राबविली जात असून स्थानिक नागरिक, व्यापारी बांधव आणि स्वयंसेवी संस्था यांचा यात सक्रिय सहभाग आहे.
या मोहिमेच्या यशामागे माननीय सहाय्यक आयुक्त (एफ उत्तर विभाग) यांचा पुढाकार असून, सहाय्यक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन), सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक, परिक्षण विभाग, मलेरिया विभाग, तसेच वडाळा टी.टी. पोलिस आणि अँटॉप हिल परिवहन विभाग यांनीही उत्साहाने सहकार्य केले आहे.
संगम प्रतिष्ठान संस्थेचे स्वयंसेवक आणि स्थानिक रहिवाशांच्या सहभागामुळे ही मोहीम आता लोकाभिमुख स्वरूप धारण करत आहे. तिसऱ्या आठवड्यातही या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला असून पुढील सात आठवड्यांपर्यंत जनजागृती आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून “ऑड डे पार्किंग” नियमन आणि “उच्चकोटी स्वच्छता दर्जा” राखण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
पर्यावरण मित्र तानाजी घाग यांनी सांगितले की, “या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये जबाबदारीची जाणीव वाढत असून ‘आठवड्यातील एक दिवस – दोन तास परिसर स्वच्छतेसाठी’ ही संकल्पना इतर विभागातही राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील.
