Friday, October 24, 2025
घरमहाराष्ट्र‘गुडबाय पोलिओ’चा संदेश देत प्रकाशमान झाली नवी मुंबई मुख्यालय इमारत

‘गुडबाय पोलिओ’चा संदेश देत प्रकाशमान झाली नवी मुंबई मुख्यालय इमारत

प्रतिनिधी : पोलिओ प्रतिबंध आणि पोलिओचे उच्चाटन करण्याचा निश्चय करुन त्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी 24 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगभरात ‘जागतिक पोलिओ दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘पोलिओमुक्त जग’ हे उद्द‍िष्ट साध्य करण्यासाठी त्याबाबत सुरु असलेल्या कामांना प्रोत्साहित करीत लसीकरण मोहिमांचे महत्व या दिवशी अधोरेखीत केले जाते. या वर्षीची पोलिओ दिनाची संकल्पना ‘पोलिओ समाप्त करा : प्रत्येक बालक, प्रत्येक लस, प्रत्येक ठिकाणी (End Polio : Every Child, Every Vaccine, Everywhere.)’ ही असून त्यादृष्टीने जागरुकता निर्माण करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई जॉय ऑफ गिव्हिंग आणि आरसीसी नवी मुंबई शेपर्स यांचे सहकार्य लाभले. या अनुषंगाने आयकॉनिक इमारत म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीवर ‘आता पोलिओ संपवा (End Polio Now)’, ‘गुड बाय पोलिओ (Goodbye Polio)’, ‘चला, भारताला पोलिओमुक्त करुया (Let’s Keep India Polio Free)’ – असे प्रकाशमान संदेश मुख्यालयाच्या मध्यवर्ती डोमवर प्रसारीत करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पोलिओ मुक्तीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत असून 12 ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विशेष पोलिओ लसीकरण मोहीम’ राबविण्यात आली. या दिवशी 721 इतक्या मोठ्या संख्येने पोलिओ बुथ कार्यान्वित करण्यात आले होते. त्यादिवशी 88 हजार 748 अपेक्षित लाभार्थ्यांपैकी 86 टक्के म्हणजे 76 हजार 818 बालकांना लसीकरण करण्यात आले. त्यादिवशी लसीकरण न झालेल्या बालकांच्या लसीकरणासाठी 17 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येऊन 826 आरोग्य पथकांनी घरोघरी जाऊन लसीकरण केले. अशाप्रकारे 12 ते 17 ऑक्टोबर कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच एकूण 92 हजार 242 बालकांचे पोलीओ लसीकरण करण्यात आले. पोलीओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र पोलीओमुक्त व्हावे दृष्टीने महानगरपालिका नियोजनबध्द पावले उचलत असून जन्मानंतर प्रत्येक मुलाला दिल्या जाणा-या विविध लसींप्रमाणेच पोलीओ लसीचे 2 थेंब मिळावेत याबाबत महानगरपालिका सतर्क असल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिवाळीनिमित्त महापालिका मुख्यालयाची इमारत दिवाळी निमित्त विविध रंगाने सजलेली असतांना त्यामध्ये पोलीओ विषयक जनजागृतीचा गुलाबी रंगही प्रदर्शित करण्यात आला असल्याचे सांगितले.

यामध्ये रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई जॉय ऑफ गिव्हिंग यांनी मानवतावादी भूमिकेतून सहभाग घेतला. पोलीओ लसीचे फक्त २ थेंब बालकाच्या आयुष्यात मोठा फरक घडवू शकतात. त्यामुळे बालकांच्या मोठ्या प्रमाणातील लसीकरणाद्वारे पोलिओमुक्त जगाची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments