प्रतिनिधी : लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाची आणि पारदर्शक प्रशासनाची पायाभरणी करणाऱ्या “माहितीचा अधिकार कायदा २००५” च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल ज्ञानमाता माहिती अधिकार संस्था, पुणे यांच्या वतीने श्री प्रकाश उघडे यांना “राज्यस्तरीय माहिती अधिकार उत्कृष्ट कार्य पुरस्कार – २०२५” प्रदान करण्यात आला आहे. या अभिमानास्पद गौरवाच्या निमित्ताने दिवाळीच्या मंगलप्रसंगी विठे गावात ग्रामस्थ, सामाजिक बांधव व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत श्री प्रकाश उघडे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामुळे विठे गावाचा अभिमान अधिक वृद्धिंगत झाला. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, शिक्षकवर्ग, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी श्री उघडे यांच्या माहिती अधिकार जनजागृतीसाठीच्या कार्याची प्रशंसा करत, प्रशासनातील पारदर्शकतेसाठी त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या.
श्री प्रकाश उघडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “हा पुरस्कार माझा वैयक्तिक सन्मान नसून, गाव, समाज आणि सर्व जनजागृत नागरिकांचा सन्मान आहे. माहिती अधिकार हा विरोधासाठी नव्हे, तर प्रशासन पारदर्शक ठेवून नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आहे.”
कार्यक्रमाला विशेष मान्यवरांची उपस्थिती लाभली
ACP आवारी साहेब (मुंबई), मा. विलास बागड (RFO नागपूर), मा. जनार्दन वाकचौरे (PWD अधिकारी ठाणे), मा. भरत आवारी, मा. विलास आवारी सर, मा. अशोक शेठ आवारी (अध्यक्ष, मारुती देव ट्रस्ट), मा. जीवन शेठ वाकचौरे (सचिव, मारुती देव ट्रस्ट), मा. मोहन वाकचौरे (विश्वस्त), मा. दत्तात्रय नामदेव वाकचौरे (चेअरमन, सोसायटी), मा. डॉ. बाळासाहेब चव्हाण, मा. नाना भिमाजी वाकचौरे (चेअरमन, सोसायटी विठे), मा. अशोक आवारी (सामाजिक कार्यकर्ते), मा. सोमनाथ आरज व सौरभ वाकचौरे (तलाठी) उपस्थित होते.
या सन्मान सोहळ्याचे शब्दांकन आणि आयोजन श्री शिवनाथ विठ्ठल आरज, चेअरमन कृषी बाजार समिती, अकोले व चेअरमन सोसायटी विठे यांनी केले.
विठे ग्रामस्थांनी केलेला हा सत्कार संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरला.
