प्रतिनिधी – ओमकार धुळप, धगधगती मुंबई
नवी मुंबई : हिंदवी साम्राज्याच्या गौरवशाली परंपरेचा वारसा जपण्यासाठी ‘संस्कृती उत्सव नवी मुंबई’तर्फे “माझा किल्ला – शिवसंस्कारांचा वारसा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात नव्या पिढीला शिवचरित्र आणि गडकोट संस्कृतीची ओळख करून देण्याचा सुंदर प्रयत्न केला जात असून, यासाठी ११ आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे — “किल्ला बांधणाऱ्या प्रत्येक गडकऱ्याला गौरवचिन्ह – एक आकर्षक ट्रॉफी” तसेच “सर्व सहकाऱ्यांच्या सहभागाचे प्रमाणपत्र” देण्यात येणार आहे.
नोंदणीची अंतिम तारीख २४ ऑक्टोबर असून, निकाल २५ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. पारितोषिक वितरण समारंभ २६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या किल्ल्याचा फोटो, संपर्क व्यक्तीचे नाव आणि क्रमांक WhatsApp क्रमांक 9819010190 वर २४ ऑक्टोबरपर्यंत पाठवायचा आहे.
या उपक्रमाचे आयोजन संस्कृती उत्सव नवी मुंबई यांनी केले असून, सहआयोजक म्हणून Child React Foundation आणि माध्यम सहयोगी म्हणून एक विचार, धगधगती मुंबई (DDM News) व Brandz Builders सहभागी आहेत.
माझा किल्ला – शिवसंस्कारांचा वारसा : ‘संस्कृती उत्सव नवी मुंबई’तर्फे उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
RELATED ARTICLES
