Thursday, October 23, 2025
घरमहाराष्ट्रराजाराम डाकवे वाचनालयातर्फे ‘तात्याश्री' दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन

राजाराम डाकवे वाचनालयातर्फे ‘तात्याश्री’ दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन

तळमावले/वार्ताहर : दिवाळी अंक ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा असून ती अखंडपणे चालू राहावी व यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी यासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्व.राजाराम डाकवे (तात्या) सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्यावतीने ‘तात्याश्री’ दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वाचनालयाच्यावतीने स्पर्धेचे हे पहिले वर्ष आणि स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित केलेले 8 वर्ष आहे. संस्था नोंदणी अधिनियम 1860 अन्वये स्व.राजाराम डाकवे (तात्या) वाचनालय व ग्रंथालय, डाकेवाडी (काळगांव) या नावाचे संस्था नोंदणी प्रमाणपत्र मंगळवार दि.23 सप्टेंबर, 2025 रोजी मिळाले आहे.
या स्पर्धेबाबत संयोजक संदीप डाकवे म्हणाले, ‘‘दिवाळीच्या फराळासोबतच वाचकांना सकस साहित्याची मेजवानी देणाऱ्या दिवाळी अंकाचा, साहित्याचा गौरव करण्यासाठी तात्याश्री दिवाळी अंक स्पर्धेचे चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये दिवाळी अंकातील साहित्य, वैविध्य, मांडणी आणि छपाईचा दर्जा या संदर्भात गुणवत्तेच्या निकषावर सर्वोत्कृष्ट 3 दिवाळी अंकांना मान्यवरांच्या हस्ते गौरवपर सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि ग्रंथ प्रदान केले जाईल. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व दिवाळी अंकांना डिजीटल सन्मानपत्र दिली जाणार आहेत.
स्पर्धेसाठी अधिकृतरित्या आलेल्या अंकामधूनच दिवाळी अंकांची निवड केली जाणार आहे. पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रांतील मान्यवर या स्पर्धेसाठी परीक्षक असतील. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. स्पर्धेत भाग घेण्यासाठी दिवाळी अंकाच्या दोन प्रती पाठवाव्यात. या निमित्ताने संग्रहित झालेल्या दिवाळी अंकापैकी एक अंक ‘पुस्तकाचं झाड’ या उपक्रमाला, दुसरा अंक वाचनालयाला भेट देण्यात येणार आहे.
याप्रसंगी वाचनालयाच्या विविध उपक्रमास भरीव सहकार्य करणार असल्याचे उपाध्यक्ष विशाल डाकवे, सेक्रेटरी रेश्मा डाकवे, खजिनदार संजय डाकवे, कार्यकारिणी सदस्य विकास डाकवे, भरत डाकवे, प्रथमेश डाकवे व अन्य मान्यवर यांनी सांगितले.
तात्याश्री दिवाळी अंक स्पर्धेसाठी आपल्या दिवाळी अंकाच्या 2 प्रती शुक्रवार दि.31 ऑक्टोबर, 2025 पूर्वी संदीप डाकवे, ‘राजनंदा प्राईड अपार्टमेंट’, फ्लॅट नं.8, होली फॅमिली काॅन्व्हेंट स्कुलच्या पाठीमागे, सैदापूर विद्यानगर, ता.कराड, जि.सातारा. 415124. मो. 9764061633 येथे पोस्टाने अथवा कुरियरने पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

चौकटीत : साहित्याला प्रेरणा देणारे उपक्रम :
भविष्यामध्ये वाचनालय व ग्रंथालयाच्या वतीने वृत्तपत्रलेखन, निबंध, चित्रकला, काव्य स्पर्धा, मोफत अभ्यासिका, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर, ग्रंथ प्रदर्शन, पुस्तक प्रकाशन, तात्याश्री साहित्य पुरस्कार, साहित्य संमेलन, कवी संमेलन, पुस्तक भेट अभियान असे साहित्याला प्रेरणा देणारे विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे मत वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments