स
ातारा(अजित जगताप) : महाराष्ट्राचे २५ वे राज्यपाल आचार्य देवव्रत हे दि. २५ व २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत . त्यांचे मनापासून स्वागत असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा व वेदना जाणून घेण्यासाठी त्यांनी सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी भागाचीही पाहणी करावी. अशी मागणी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब चव्हाण, क्रांतीसिंह नाना पाटील संभाजी ब्रिगेडचे विजय पाटील, धनसिंगकुमार जाधव व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, फलटण या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेवरही बंदोबस्ताचा ताण पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय आचार्य देवव्रत हे राज्यपाल झाल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्यात येत आहे. नियोजित दौऱ्याची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू आहे.शनिवार दि २५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वा. राजभवन, महाबळेश्वर येथे आगमन महाबळेश्वर येथून साताराकडे प्रयाण. दुपारी३.४५ वा. कास पठार, मुनावळे, ता. जावळी येथील वॉटर स्पोर्टस ॲकटिव्हिटीस उपस्थिती त्यानंतर रात्री राज भवन महाबळेश्वर येथे आगमन व कम करणार आहेत.
दुसऱ्या दिवशी रविवारी दि. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी महाबळेश्वर येथील आर्थर सिट पॉईंट, सावित्री पॉईंट , इलिफनस्टन पॉईंट, कॉटेज पॉईंट पहाणी करून दुपारी २.२५ वा. राजभवन महाबळेश्वर येथून वेण्णा लेक, टेबल लँड पाचगणी आणि टेबल लँड पाचगणी येथून पुण्याकडे प्रयाण करणार आहेत. असा त्यांचा शासकीय नियोजित दौरा आहे.
या कालावधीमध्ये त्यांनी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या सोयीनुसार अतिवृष्टी झालेल्या सातारा, जावळी, महाबळेश्वर तालुक्यातील रस्त्यावरील गरीब व अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या शेतावर जाऊन पाहणी करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी कळकळीची विनंती अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
राज्यपाल हे संविधानात्मक व घटनात्मक पद असून राज्याचे प्रशासकीय पालक म्हणून त्यांनी शेतकऱ्याच्या संबंधात मानवता भावनेतून निर्णय घ्यावा. तसेच शेतकऱ्यांना आणि अडचणीला धावून येणारे महाराष्ट्राचे राज्यपाल देवदूत बनून आले. अशी प्रतिमा तयार होण्यास या पाहणी दौऱ्याने मदत होणार आहे. अशीही अपेक्षा शेतकरी वर्गातून करण्यात आलेली आहे.
_________________________
फोटो सातारा जिल्ह्यात झालेले अतिवृष्टीचे नुकसान व राज्यपाल आचार्य देवव्रत