Tuesday, October 21, 2025
घरमहाराष्ट्रधारावी पोलिसांची दिवाळी भेट — हरवलेले ७२ मोबाईल फोन शोधून मालकांना परत!

धारावी पोलिसांची दिवाळी भेट — हरवलेले ७२ मोबाईल फोन शोधून मालकांना परत!

मुंबई(भीमराव धुळप): धारावी पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत चोरी झालेले तसेच हरवलेले मोबाईल फोन शोधण्याच्या मोहिमेत उल्लेखनीय यश मिळाले आहे. CEIR पोर्टलवर नोंद झालेल्या मोबाईल फोनपैकी एकूण ७२ विविध कंपन्यांचे मोबाईल फोन धारावी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई क्र. १४१३८९ समीर पिंजारी यांनी कौशल्यपूर्ण तपासाद्वारे शोधून काढले आहेत.ही कारवाई मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ श्री. महेंद्र पंडित साहेब तसेच धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजु भा. बिडकर यांच्या सूचनांनुसार व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विविध इसमांकडून हस्तगत करण्यात आलेल्या या मोबाईल फोनची एकूण किंमत अंदाजे ₹१०,८०,०००/- (दहा लाख ऐंशी हजार रुपये) इतकी आहे.विशेष म्हणजे, धारावी पोलीस ठाण्याच्या वतीने दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मागील दोन वर्षांपासून हरवलेले मोबाईल शोधून त्यांच्या मालकांना परत देण्यात आले. आपला मोबाईल हरवलेला परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाची लहर उमटली. अनेकांनी कष्टाने, हप्त्यांवर किंवा लोनवर मोबाईल घेतलेले असल्याने त्यांचे पुन्हा मिळणे ही खरी दिवाळी ठरली.ही संपूर्ण मोहीम वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली असून, पोलीस शिपाई समीर पिंजारी यांनी दाखवलेली तत्परता, तांत्रिक कौशल्य आणि नागरिकाभिमुख वृत्ती ही प्रशंसनीय ठरली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments