तापोळा(नितीन गायकवाड) : – महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट या गावातील रहिवाशी राघू जानू कदम या शेतकराचा जागीच मृत्यू झाला.
राघू कदम हे सकाळी शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपारी नंतर गावातील अन्य लोक शेतात जात असताना राघू कदम पडलेले दिसले. गव्यमे जबर हल्ला केल्याने गव्याचे शिंग छाती फाडून निघाली आहे. जोरदार धडक दिल्याने राघू कदम हे जागीच ठार झाले.
रानगवे यांची संख्या जास्त झाल्याने शेतीचे नुकसान करत आहेत त्यामुळे अनेक शेतकरी यांनी शेती करणे सोडून दिले आहे. आजची घटनामुळे गावातील तसेच विभागातील शेतकरी यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गव्याचा हल्ला एवढा प्रचंड होता हो राघू कदम यांच्या शरीराच्या चिधड्या झाल्या आहेत. ही दुःखद घटना समजताच विभागातील लोकांचा जनसमुदाय जमा झाला. रानगवे. रान डुक्कर यांच्या तरसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या घटनेमुळे लोकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
घटना स्थळी फॉरेस्ट अधिकारी. पोलीस कर्मचारी उपस्थित झाले आहे त्याच्या पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी पुढील कार्यवाही सुरु आहे.
रान गव्याच्या हल्ल्यात सोनाट येथील शेतकरी ठार
RELATED ARTICLES