Wednesday, October 22, 2025
घरमहाराष्ट्रमारुती गणपती मंदिर, वाघावळे येथे भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न;अनेक मान्यवरांची उपस्थितीत

मारुती गणपती मंदिर, वाघावळे येथे भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न;अनेक मान्यवरांची उपस्थितीत

प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यातील वाघावळे गावातील ग्रामदेवत मारुती गणपती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात पार पडले. या मंगलमय सोहळ्याला ग्रामस्थांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

भूमिपूजन श्री. राजेंद्र शेठ राजपुरे (संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा) आणि श्री. नानजीभाई ठक्कर (उद्योगपती व समाजसेवक, ठाणावाला) यांच्या हस्ते संपन्न झाले. मदत व पुनर्वसन मंत्री मा.आ. मकरंद आबा पाटील हे कार्यक्रमास येऊ शकले नाहीत, मात्र त्यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत लवकरच कांदाटी भागातील विकासकामांवर बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
बाबूदादा सकपाळ (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाबळेश्वर), संजय गायकवाड (माजी सभापती, पंचायत समिती, महाबळेश्वर), संजय मोरे (सदस्य, जिल्हा नियोजन समिती, सातारा), धोंडीबा शंकर जंगम (माजी सदस्य, पंचायत समिती, महाबळेश्वर), प्रवीणशेठ भिलारे (सदस्य, जिल्हा नियोजन समिती, सातारा), संजय देसाई (लाखवड), संजय उतेकर (सरपंच, वाणवली) उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत भाषण ॲड.संजय बाळकृष्ण जंगम यांनी केले. तर सुनील रघुनाथ जंगम यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराची प्रस्तावना मांडली.
मंदिराचे बांधकाम टोपारे बंधू, सातारा यांच्या मार्फत होणार असून अंदाजित खर्च सुमारे ₹५० लाख आहे

यावेळी राजेंद्र शेठ राजपुरे यांनी आपल्या भाषणात गावातील एकतेचे आणि श्रद्धेचे महत्त्व अधोरेखित केले. स्व. शिवराम बापू यांच्या परंपरेचा गौरव करत त्यांनी म्हटले, “मंदिराचा जीर्णोद्धार ही आपल्या संस्कृती व एकात्मतेचे प्रतीक आहे.

हरीश्चंद्र जंगम (संस्थापक, वैभव सहकारी पतपेढी, घाटकोपर) यांनी सूशासन आणि विकासकामांचा आढावा घेत गावातील रस्ते, पाणी व शिक्षण या मूलभूत गरजांवर लक्ष देण्याचा निर्धार व्यक्त केला.
संजय मोरे यांनी श्री जोम मल्लिकार्जुन मंदिरापर्यंतचा रस्ता एका वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले व वाघावळे येथील युवकांच्या एकतेचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती सिताराम शिवराम जंगम, रामचंद्र रखमाजी जंगम, गोविंद रामचंद्र जंगम, श्रीमती हौसाबाई जंगम (सरपंच, वाघावळे), बाळकृष्ण लक्ष्मण जंगम, चंद्रकांत दिवसे (ग्रामसेवक), बापू पाटील, कृष्णा बा. जंगम (फौजदार), आणि महादेव गुरुजी जंगम उपस्थित होते.
गावकऱ्यांच्या तसेच तरुण युवकांच्या उत्स्फूर्त सहभागाने, श्रद्धेने आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मारुती गणपती मंदिर भूमिपूजन सोहळा अत्यंत भावपूर्ण आणि उत्साहात पार पडला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments