कराड(प्रताप भणगे) : अथणी शुगर रयत सहकारी साखर कारखान्याच्या युनिट क्र. ३, शेवाळेवाडी येथे गळीत हंगाम 2025-26 च्या मोळी पूजनाचा कार्यक्रम आज उत्साहात पार पडला.
या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन माननीय श्री. उदयसिंह (दादा) पाटील उंडाळकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर माननीय श्री. योगेश पाटील साहेब तसेच युनिट हेड माननीय श्री. रविंद्र देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत पूजन विधी पार पडला.
या वेळी कामगार संघटनेतर्फे कारखान्याचे चेअरमन श्री. उदयसिंह (दादा) पाटील उंडाळकर यांचा, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री. योगेश पाटील व युनिट हेड श्री. रविंद्र देशमुख यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व संचालक मंडळाने कामगार आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य, सर्व खातेप्रमुख आणि कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.