कराड(अमोल पाटील) : जिंती तालुका कराड येथील उद्योजक श्री संदीप तानाजी खोचरे यांच्या वडिलांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त दिनांक १७ ऑक्टोबर रोजी रात्री ८.०० वाजता कीर्तनकार ह भ प ज्ञानेश्वर महाराज फलके यांचे कीर्तन पहिल्यांदाच जिंती येथे होणार आहे.
जिंती गावात पहिल्यापासूनच वारकरी सांप्रदायाचा वारसा असलेले गाव आहे. “पुत्र व्हावा ऐसा तिन्ही जगा, नाम घेता उर भरून यावा.” याप्रमाणे श्री संदीप तानाजी खोचरे यांनी कीर्तनाच्या रूपाने आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त विशेष किर्तन आयोजित करून वारकरी संप्रदायातून नवीन पिढीला वडीलच देव आहेत असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या कीर्तनासाठी जिंती परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात येत आहे.
वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त जिंती येथे ह. भ.प.पुणेकरांचे कीर्तन
RELATED ARTICLES