प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाचा पत्रकारितेतील सर्वोच्च वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार शुक्रवार दि.23 फेब्रुवारी, 2024 रोजी जाहीर झाला होता. या पुरस्काराची रक्कम डाॅ.डाकवे यांच्या खात्यात शुक्रवार दि.26 एप्रिल, 2024 रोजी जमा झाली आहे. डाॅ.डाकवे यांनी यातील रु.5,001/- रक्कम वादळामध्ये नुकसान झालेल्या न्यू इंग्लिश स्कुल काळगांव शाळेच्या डागडुजीसाठी शाळेचे मुख्याध्यापक अनिल कांबळे, महादेव थोरात, संचालक विक्रमसिंह देसाई यांच्याकडे सुपुर्द करत मनाचा संवेदनशीलपणा जपला आहे.
बुधवार दि.24 एप्रिल, 2024 रोजी झालेल्या वादळी पावसात शाळेच्या इमारतीचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्या शाळेत आपण शिकलो, घडलो त्या शाळेच्या ऋणातून काही प्रमाणात उतराई होण्यासाठी डाॅ.संदीप डाकवे यांनी आपल्याला मिळालेल्या शेतीमित्र पुरस्कारातील काही रक्कम देवू केली आहे.
डाॅ.संदीप डाकवे यांनी शेतीमित्र पुरस्कारातील रक्कम दिली शाळेसाठी
RELATED ARTICLES