मुंबई : दिवाळीपूर्वी राज्यातील महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे.
मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये, ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना २४ हजार ५०० रुपये, तर नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना तब्बल ३४ हजार ५०० रुपये इतका बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्तांना बोनस रक्कम तात्काळ कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या घरात दिवाळीपूर्वीच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.