महाबळेश्वर(नितीन गायकवाड) : भारतीय बौद्ध महासभा तालुका महाबळेश्वर अंतर्गत शाखा मुंबईचे सरचिटणीस आयु. भरतजी कदम यांचे सुपुत्र आराध्य भरत कदम याने कराटे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सलग तीन वर्षे महाराष्ट्र कराटे असोसिएशनच्या स्पर्धेत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल आराध्य याला ब्लॅक बेल्ट प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
आराध्यच्या या कामगिरीबद्दल सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला व क्रीडा क्षेत्रातून त्याचे विशेष कौतुक होत आहे. आपल्या यशाचे श्रेय आराध्यने आपल्या शिक्षकांना, प्रशिक्षकांना तसेच आई-वडील आणि संपूर्ण कुटुंबाच्या प्रेम व पाठिंब्याला दिले आहे.
“या क्षेत्रात अजून मोठं नाव कमवायचं आहे, स्वप्नं खूप मोठी आहेत,” असे आराध्यने यावेळी सांगितले.
आराध्य भरत कदम याचे या उत्कृष्ट यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन तसेच आगामी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!