कराड (प्रताप भणगे) – उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोदय अभियानांतर्गत वसुंधरा महिला प्रभाग संघ, काले यांच्या संचलित अन्नपूर्णा महिला उत्पादक गट वाठार यांच्या श्रीलक्ष्मीपूजन पूजा साहित्य विक्री उपक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती कराडचे माननीय गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्रभाग समन्वयक काले जिल्हा परिषद गटाचे करण जाधव, तसेच संबंधित बचत गटातील महिला दीपाली पाटील (वाठार) आणि प्रियांका पाटील (सीआरपी, वाठार) उपस्थित होत्या.
या उपक्रमांतर्गत पंचायत समिती कराड येथे सोमवार, दि. १३ ऑक्टोबर २०२५ ते शनिवार, दि. १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत श्रीलक्ष्मीपूजनासाठी लागणारे सर्व साहित्य माफक दरात उपलब्ध राहील.
या उपक्रमाचा अधिकाधिक ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी केले आहे.