Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशधारावी पुनर्विकासाचे स्वप्न राहुल शेवाळेच पूर्ण करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारावीच्या...

धारावी पुनर्विकासाचे स्वप्न राहुल शेवाळेच पूर्ण करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारावीच्या जाहीर सभेत व्यक्त केला विश्वास

प्रतिनिधी : राहुल शेवाळे हे स्वतः धारावीतून आलेले आहेत. धारावीतील लोकांच्या समस्यांची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे धारावीचा पुनर्विकास राहुल शेवाळेच करणार” अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारावी येथील जाहीर सभेत विश्वास व्यक्त केला. मंगळवार सायंकाळी धारावीतील कामराज हायस्कूल जवळ पार पडलेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. धारावीतून कोणालाही बाहेर काढले जाणार नसून सर्वांना धारावीतच घर दिले जाईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. या जाहीर सभेला तामिळनाडूचे भाजपा अध्यक्ष के अन्नामलाई, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, आमदार प्रसाद लाड, आमदार तमिळ सेलवन, आमदार सदा सरवणकर, अभिनेते दिगंबर नाईक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात धारावीकरांना पुनर्विकासाचे आश्वासन दिले. सर्वांना धारावीतच घर मिळेल, पुनर्विकास प्रक्रियेत धारावीतून एकही नागरिक बाहेर फेकला जाणार नाही आणि पुनर्विकासाचे स्वप्न महायुती सरकार पूर्ण करेल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. धारावीला धर्म ,जाती आणि पंथाच्या नावाने तोडणाऱ्या लोकांना येत्या 20 मेला चोख प्रत्युत्तर द्या, असे आवाहनही त्यांनी केले. धारावीतील गरिबांचे दुःख समजून घेऊ शकणारे राहुल शेवाळे यांनाच विजयी करा, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित जनतेला आवाहन केले. ज्यांना धारावीच्या गल्ल्यांमध्ये फिरणे देखील शक्य नाही अशा उमेदवाराला येत्या 20 मेला मतपेटीतून चोख उत्तर द्या असेही त्यांनी सांगितले.

राहुल शेवाळे यांनी आपल्या भाषणात धारावी पुनर्विकासासाठी गेल्या दहा वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याची माहिती जनतेला दिली. तसेच धारावी पुनर्विकास प्रकल्पात कोणत्याही नागरिकाला धारावी बाहेर फेकले जाणार नाही, धारावीचा पुनर्विकास हा प्रत्येकाला मकान, दुकान देणारा आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मुस्कान फुलवणारा असेल अशा शब्दात राहुल शेवाळे यांनी पुनर्विकासाची ग्वाही दिली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments