मुंबई(अमोल पाटील) : मुंबई येथे १२ ऑक्टोबर रोजी सौ. सुनिता पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचा पुरस्कार पहिल्यांदाच सुनीता पाटील यांना मिळाला. मराठी विषयाचे अध्ययन साहित्य ,समाजसेवा , संघटनात्मक कार्य असे विविध उपक्रम भारती विद्यापीठाच्या श्रीपतराव कदम प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मध्ये शिक्षिका सौ.सुनीता पाटील यांची यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सौ.सुनिता पाटील यांनी २८ वर्षे ज्ञानदानाचे काम करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. माय मराठी अध्यापक संघ महाराष्ट्र सह म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मुलगी वाचवा विषयावर पथनाट्य, आषाढी वारी निमित्त दिंडी सोहळा अशा विविध साहित्य संमेलनात काव्य वाचन केले आहे. गरीब , होतकरु,मुलांना गणवेश , वह्या वाटप तसेच अनाथ आश्रम पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे.
या कार्यक्रमा वेळी माननीय श्री हर्षवर्धनजी सपकाळ-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष, शिक्षक आमदार जयंत तासगावकर,सचिन नाईक, साजिद भाई पठाण इत्यादी मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सौ.सुनिता पाटील यांच्यावर श्रीपतराव कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज यांच्याकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
सौ सुनीता पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित
RELATED ARTICLES