प्रतिनिधी : श्री निनाई देवी विद्यालयाची विद्यार्थिनी श्रुती गणेश थोरात इयत्ता नववी हिने शाहू क्रीडा संकुल सातारा या ठिकाणी झालेल्या शालेय 17 वर्षाखालील 63 किलो वजन गटातील स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
यामुळे विद्यालयाची मान उंचावली आहे. तिची सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तिला ज्येष्ठ शिक्षक व क्रीडा शिक्षक आनंदराव जानुगडे यांनी सखोल मार्गदर्शन केल्याने हे सुयश प्राप्त झाले.
जानुगडे सर सातत्याने प्रयत्न करून विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारामध्ये तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरापर्यंत नेत आहेत.
तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट आनंदराव पाटील, सचिव बी . आर. यादव, मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकरराव माने, वैभव जाधव, रघुनाथ पोतदार, अस्मिता पाटील, जयवंत काटेकर, विठ्ठल काटेकर तसेच तुळसण, विठ्ठलवाडी, पाचुपतेवाडी येथील ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले आहे.
श्री निनाई देवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा शालेय क्रीडा स्पर्धेत डंका…..
RELATED ARTICLES