मुंबई(रमेश औताडे) : शाळेत जात असताना एका विद्यार्थिनीवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिच्या मानेवर आणि शरीराच्या इतर भागांवर बिबट्याच्या नखांचे व दातांचे खोलवर ओरखडे आणि जखमा झाल्या आहेत. जखमी विद्यार्थिनीला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी तातडीने बिबट्याला मारण्याची परवानगी मिळावी अशी मागणी समोर येत आहे.
संगमनेर तालुक्यातील डिग्रस माध्यमिक विद्यालयाच्या एका विद्यार्थिनीवर सकाळी शाळेत जाताना बिबट्याने हल्ला केला. या घटनेमुळे परिसरातील विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आमची मागणी मान्य करा अन्यथा पालक तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.