बदलापूर
: दिवाळीचा आनंद सर्वांनी एकत्र साजरा करण्याचा सुंदर संदेश देत प्राणजी गार्डन सिटी फेस टू कात्रप बदलापूर सोसायटीचे प्रल्हाद राणे, सुषमा बिडवे,पूजा पटेल, नीतू दास तसेच ॲक्टिव्ह ग्रुपचे सर्व सदस्य यांनी सामाजिक बांधिलकी जपत बदलापूर येथील स्व. निर्मलादेवी चिंतामण दिघे आश्रमशाळेतील मुलांची दिवाळी गोड केली.
या उपक्रमांतर्गत सोसायटीच्या सदस्यांनी मुलांना स्वादिष्ट नाश्ता, खेळणी आणि कपडे भेट देत सणाचा आनंद मुलांपर्यंत पोहोचविला. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहून हा सण अधिकच अर्थपूर्ण झाला.
या प्रसंगी प्रल्हाद राणे यांनी सांगितले, “दिवाळी हा आनंदाचा आणि एकत्र येण्याचा सण आहे. समाजातील गरजू मुलांसोबत तो साजरा केल्याने सणाला खऱ्या अर्थाने उजाळा मिळतो.” या उपक्रमात सोसायटीच्या ॲक्टिव्ह ग्रुपच्या सर्व सदस्यांनी आणि प्राणजी गार्डन सिटी फेज २ च्या सर्व रहिवाश्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. अशा उपक्रमांमुळे सामाजिक जाणीव वाढीस लागते आणि एकत्र येऊन सकारात्मक बदल घडवता येतो, हा भावनिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.