Tuesday, October 14, 2025
घरआरोग्यविषयकसायन प्रतीक्षा नगरात “स्वच्छ प्रतीक्षा नगर” अभियानाची सुरुवात — लोकसहभागातून स्वच्छतेचा संकल्प

सायन प्रतीक्षा नगरात “स्वच्छ प्रतीक्षा नगर” अभियानाची सुरुवात — लोकसहभागातून स्वच्छतेचा संकल्प

ुंबई : प्रतीक्षा नगर प्रभाग क्रमांक १७३ येथे “स्वच्छ प्रतीक्षा नगर” या लोकसहभागातून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाची सुरुवात शनिवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता झाली. या अभियानात वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. पाटील (परिवहन विभाग) यांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबरोबरच स्थानिक रहिवासी, पत्रकार बांधव, समाजसेवक आणि मनपा विभागांचे अधिकारी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे — परिसरातील दुतर्फा पार्किंग हटविणे, “ऑड डे पार्किंग” नियम प्रभावीपणे लागू करणे, तसेच नियमित स्वच्छता राखणे. ही जबाबदारी केवळ परिवहन विभागाची नसून, टी.टी. पोलिस ठाणे, मनपा एफ. नॉर्थ वॉर्डचे परिरक्षण विभाग, पेस्ट कंट्रोल विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, तसेच स्थानिक नागरिकांचा सामूहिक सहभाग आवश्यक आहे, हे यावेळी अधोरेखित करण्यात आले.“आठवड्यातील एक दिवस — परिसर स्वच्छतेसाठी” या संकल्पनेतून सुरू झालेल्या या चळवळीचा कालावधी सुमारे १० आठवड्यांचा असेल. दर शनिवारी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत प्रतीक्षा नगरातील मुख्य रस्ते, फुटपाथ, आणि पार्किंग क्षेत्र स्वच्छ करण्याचे काम चालणार आहे.कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आली. यावेळी संगम प्रतिष्ठानचे पदाधिकारी व स्वयंसेवक, मनपा एफ. नॉर्थचे अधिकारी, आर.टी.ओ. पोलिस प्रतिनिधी, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी पर्यावरण मित्र तानाजी घाग यांनी सांगितले की,

“ही मोहिम केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून, नागरिकांच्या सहभागातून जबाबदार शहरनिर्मितीचा एक प्रयत्न आहे. प्रत्येक शनिवारी लोकांनी सहभागी होऊन प्रतीक्षा नगर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी हातभार लावावा.”

या उपक्रमामुळे प्रतीक्षा नगर परिसरात स्वच्छतेबाबत जागरूकता वाढून, नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments